पाथरी तालुक्यात तीन शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Published: May 27, 2017 07:11 PM2017-05-27T19:11:53+5:302017-05-27T19:11:53+5:30

पाथरी तालुक्यात दोन दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने परभणी जिल्हा हादरून गेला आहे

Suicide of Three Farmers in Pathri Taluka | पाथरी तालुक्यात तीन शेतक-यांच्या आत्महत्या

पाथरी तालुक्यात तीन शेतक-यांच्या आत्महत्या

Next
>ऑनलाइन लोकमत
दोघांनी घेतला गळफास : तर एकाने घेतले कीटकनाशक
पाथरी (परभणी), दि. 27 - कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून पाथरी तालुक्यात दोन दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने परभणी जिल्हा हादरून गेला आहे.
 
पाथरी तालुक्यातील लोणी बु. येथील शेतकरी मारोती निवृत्ती रासवे (वय ५२) या शेतकऱ्याने २६ मे रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आपल्या राहत्या घरी छतावर कीटकनाशक औषध प्राशन केले. त्यांच्या पत्नी जेवणाचे ताट घेऊन छतावर गेल्या असता त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. घटनेनंतर मारोती रासवे यांना पाथरी येथे आणि परभणी येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. २७ मे रोजी पहाटे एक वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुले असून एक अपंग आहे. तर एकाचे लग्न झाले आहे.त्यांच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्राचे ६० हजार , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे २० हजार रुपयांचे कर्ज होते. या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. 
 
दुसरी घटना पाथरगव्हाण बु. येथे घडली. येथील शेतकरी परमेश्वर बन्सीधर घांडगे या शेतकऱ्याने २७ मे रोजी पहाटे १ च्या सुमारास घरातील माळवदाच्या कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकऱ्याच्या कुटुंबात साडेचार एकर शेती आहे. त्यांच्या नावावर स्टेट बँक हैदराबाद शाखेचे १ लाख ६० हजार रुपये तर जिल्हा बँकेचे ६० हजार रुपये असे २ लाख २ हजार रुपयांचे कर्ज होते. नापिकी आणि कर्जाला कंटाळून या शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. तर तिसरी घटना तालुक्यातील सिमूरगव्हाण येथे घडली. येथील कैलास बालासाहेब उगले (वय २७) या अविवाहित तरूणाने २६ मे रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. उपचारा दरम्यान त्याचा दुपारी दीड वाजता मानवत येथे मृत्यू झाला. या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर शनिवारी या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली.

Web Title: Suicide of Three Farmers in Pathri Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.