दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: August 24, 2015 01:30 AM2015-08-24T01:30:38+5:302015-08-24T01:30:38+5:30
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना अमरावती आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये घडल्या.
अमरावती/ जळगाव : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना अमरावती आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये घडल्या.अमरावतीतील फत्तेपूर येथील एका वृद्ध शेतकऱ्याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली.
ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. शिवाजी भीमराव राऊत (६०) मृताचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांच्यावर बँकेचे सव्वादोन लाख रुपयांचे कर्ज होते.
जळगावातील पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील सुकलाल गोधा पाटील (५५) या शेतकऱ्यानेही विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. पाटील यांच्यावर विविध सोसायट्यांचे अडीच लाख व हात उसनवारीचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. (प्रतिनिधी)