निवृत्त पोलीस अधिका-याची पत्नीसह आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:20 AM2018-01-31T04:20:52+5:302018-01-31T04:21:07+5:30
निवृत्त पोलीस निरीक्षकाने पत्नीचा खून करून डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. बबन पांडुरंग बोबडे (वय ६४, मूळ गाव खटाव, जि. सातारा), त्यांची पत्नी सुरेखा (६०) अशी त्यांची नावे आहेत.
कोल्हापूर : निवृत्त पोलीस निरीक्षकाने पत्नीचा खून करून डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी दुपारी उघडकीस आले. बबन पांडुरंग बोबडे (वय ६४, मूळ गाव खटाव, जि. सातारा), त्यांची पत्नी सुरेखा (६०) अशी त्यांची नावे आहेत.
बोबडे दाम्पत्य गेल्या एक वर्षापासून देवकर पाणंद, राजलक्ष्मीनगर येथे फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होते. सोमवारी रात्री जेवण करून दोघेही झोपले.
मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास मोलकरणीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर
तिने दिलेल्या माहितीनंतर नातेवाईकांनी घरात प्रवेश केला असता बोबडे दाम्पत्य मृतावस्थेत आढळले. फ्लॅटमध्ये पोलिसांना पाच पानी चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये फ्लॅट सोडून जाण्यास घरमालकिणीने तगादा लावल्याच्या कारणातून आम्ही आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. मात्र, बोबडे यांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती. पत्नी सुरेखा यांना मधुमेहाचा त्रास होता. दोघांवरही औषधोपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येमागे आजारपण, कौटुंबीक वाद यापैकी काही कारण असू शकते का? या दृष्टीनेही तपास सुरू आहे.