अकोल्यात शेतक-याची आत्महत्या
By Admin | Published: September 14, 2016 12:15 AM2016-09-14T00:15:54+5:302016-09-14T00:16:16+5:30
सततच्या नापिकीला कंटाळून शेतक-याने केली विष प्राशन करून आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील आगर येथील घटना.
आगर (जि. अकोला), दि. १३: अकोला तालुक्यातील निंबी (मालोकार) येथे सततच्या नापिकीला कंटाळून कीटकनाशक प्राशन करणार्या सुनील बाळू शेगावकर (३0) या शेतकर्याचा उपचारादरम्यान ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.
सुनील शेगावकर यांच्याकडे ४ एकर शेती होती. गेल्या चार वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे त्यांना उत्पादनामध्ये नुकसान सहन करावे लागत होते. यावर्षी कर्ज घेऊन त्यांनी शेतीची पेरणी केली; परंतु प्रारंभी जास्त पाऊस व नंतर पावसाने मारलेली दडीमुळे याहीवर्षी हातात काहीच येणार नसल्याच्या नैराश्यातून सुनीलने १0 सप्टेंबरला शेतात कीटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने अकोला येथे उपचारार्थ दाखल केले; परंतु उपचारादरम्यान ११ सप्टेंबरला निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार असून घरातील कर्ता गेल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पुढील तपास जुने शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.