बुलडाण्यात कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: February 4, 2016 01:46 AM2016-02-04T01:46:19+5:302016-02-04T01:46:19+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील आडविहीर येथील घटना.
मोताळा (जि. बुलडाणा) : सततची नापिकी व कर्जामुळे नैराश्य आलेल्या ५0 वर्षीय शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी आडविहीर शिवारात संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
भानुदास बाळकृष्ण खाचने (वय ५0) रा. आडविहीर असे मृतक शेतकर्याचे नाव आहे. खाचने यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती होती. त्यांच्याकणं बँकेचे व खासगी सावकारांचे जवळपास दोन लाख रूपये कर्ज असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. या वर्षी अत्यल्प पावसाने त्यांचे पीक हातातून गेले होते. उत्पन्न नाही आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर या विंवचनेतून त्यांनी नवृत्ती इंगळे यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी उघडकीस आलेल्या या घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना दिल्यानंतर पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केला.भानुदास खाचने या शेतकर्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याने कुटुंबाचा आधार गेला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा आप्त परिवार आहे.