दिवाळीच्या दिवशी शेतक-याची आत्महत्या
By admin | Published: October 31, 2016 05:38 PM2016-10-31T17:38:01+5:302016-10-31T17:38:01+5:30
सर्वत्र दिवाळी सण साजरा होत असताना यवतमाळातील एका शेतक-याने कर्जाच्या विवंचनेत विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
Next
style="font-family: HelveticaNeue, "Helvetica Neue", Helvetica, Arial, "Lucida Grande", sans-serif; font-size: 16px;">
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 31 - सर्वत्र दिवाळी सण साजरा होत असताना यवतमाळातील एका शेतक-याने कर्जाच्या विवंचनेत विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. प्रवीण प्रभाकर मानकर (४९) रा.गांधीनगर यवतमाळ असे या शेतकºयाचे नाव आहे.
या शेतकºयाकडे बाभूळगाव तालुक्याच्या कोटंबा येथे आठ एकर शेती आहे. त्यावर बँकेचे आणि खासगी कर्ज आहे. गेली काही वर्षांपासून नापिकीमुळे तो कर्जाची परतफेड करू शकला नाही. या विवंचनेतच त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितल्या जाते. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी वैशाली, मुलगा प्रतीक व मोठा आप्त परिवार आहे. (वार्ताहर)