बारामतीत एमपीएससीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 10:52 AM2017-07-21T10:52:24+5:302017-07-21T11:05:44+5:30

बारामतीत स्पर्धा परीक्षेला बसलेल्या किर्ती जगन्नाथ शेरे या विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे.

Suicides of MPSC students in Baramati | बारामतीत एमपीएससीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

बारामतीत एमपीएससीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

बारामती, दि. 21- बारामतीत स्पर्धा परीक्षेला बसलेल्या किर्ती  जगन्नाथ शेरे या विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. किर्ती हिने तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. किर्तीने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत सीआरपीएफच्या कंमाडोने फसवणुक केल्याचं म्हंटलं आहे. गणेश राऊत असं या सीआरपीएफ कंमाडोचं नाव असून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश राऊतसह इतर 7 जणांवरही  बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
प्रेमात गणेशने आपली फसवणूक केल्याचं किर्तीने चिठ्ठीत लिहीलं आहे. तसंच इतर सात जणांनी तिला आत्महत्या करायला भाग पाडल्याचंही तिने चिठ्ठीत लिहीलं आहे. गोरख राऊत. शितल, सुप्रीया, महादेव निगडे, किरण निगडे, संजय निगडे, सचिन काटे अशी इतर सात जणांची नावं आहेत. 
 
सचिन काटे ही व्यक्ती मला बहीण मानत होती. पण हा माणूस अतिशय निच असून त्याला बहीण शब्दाचा अर्थ कळत नसल्याचं किर्तीने चिठ्ठीत लिहीलं आहे. किर्तीने चिठ्ठीत लिहिलेली माणसं तिला ब्लॅकमेल करत असल्याचं म्हंटलं आहे. तसंच या लोकांनी मैत्रीच्या नावावर मला मानसिक त्रास दिला. ही लोक माझ्याकडे शरीरसबंधाचीही मागणी करायचे, असं किर्तीने म्हंटलं आहे. 
घरी जर ही परिस्थिती सांगितली असती तर घरच्यांना त्रास झाला असता, म्हणून हा प्रकार घरच्यांपासून लपवून ठेवल्याचं किर्तीने चिठ्ठीत लिहिलं आहे. 

Web Title: Suicides of MPSC students in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.