जुगार खेळण्यासाठी पैसे मिळाले नाही म्हणून आत्महत्या
By admin | Published: July 4, 2016 02:47 PM2016-07-04T14:47:36+5:302016-07-04T14:48:25+5:30
जुगार खेळण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने क्षुब्ध झालेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ४ - जुगार खेळण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने क्षुब्ध झालेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामजी आंबेडकर नगरात रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
गजानन बाबूराव येरणे असे मृताचे नाव आहे. तो आठवा मैल परिसरातील रामजी आंबेडकरनगरात राहतो. रविवारी तो दिवसभर पत्त्याच्या जुगारात बसला आणि अडीच हजार रुपये हरला. त्यानंतर सायंकाळी ६.३० च्या सुमारास घरी आला आणि त्याने पत्नीला पैश्याची मागणी केली. तुझ्याकडे अडीच हजार रुपये होते, त्याचे काय झाले, अशी पत्नीने विचारणा केली असता त्याने ते जुगारात हरल्याची माहिती दिली. आता आणखी पैसे दिल्यास तो जुगारात हरेल, याची कल्पना आल्याने पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर वाद नको पत्नी घराबाहेर निघून गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या येरणेने घरात गळफास लावून आत्महत्या केली.
काही वेळेनंतर पत्नी घरी परतली तेव्हा तिला पती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. तिने आरडाओरड करून शेजा-यांना गोळा केले. पोलिसांही बोलविण्यात आले. येरणेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. वाडी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे आंबेडकरनगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.