दोन शेतकºयांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:48 AM2017-11-02T00:48:15+5:302017-11-02T00:48:21+5:30
जिल्ह्यात दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९६ झाली आहे.
नाशिक : जिल्ह्यात दोन शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ९६ झाली आहे. कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण कायम असून, त्यात खंड पडलेला नाही. विशेष म्हणजे यंदा राज्य सरकारने शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याबरोबरच केंद्र सरकारनेही शेतकºयांसाठी अनेक योजना लागू केल्या असतानाही शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक चित्र आहे. मंगळवारी दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथील आनंदा नारायण केदारे (७०) या वृद्ध शेतकºयाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. लागोपाठ दोन दिवसाच्या शेतकरी आत्महत्येने जिल्ह्णातील संख्या ९६ च्या घरात पोहोचली असून, गेल्या वर्षी हेच प्रमाण ८६ इतके होते. शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्याकामी शासनाची कोणतीही मात्रा लागू पडत नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
अपंग शेतकºयाची आत्महत्या
जायखेडा येथील मधुकर पुंडलिक पवार (५५) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. अपंग मधुकर पवार यांनी सोसायटीचे कर्ज उसनवारी करत फेडले. त्यातच मुलीचे लग्न कसे करावे व उसनवारीचे कर्ज फेडावे कसे या विवंचनेत ते असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. गुरुवारी सकाळी कुटुंबीयानी त्यांचा शोध घेतला असता रघुनाथ देवरे यांच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळला.