Sujay Vikhe Patil: 'पक्षाने कारवाई केली तरी शिवसेनेलाच साथ देणार', खासदार सुजय विखे असं का म्हणाले..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2022 12:48 PM2022-06-12T12:48:40+5:302022-06-12T13:08:53+5:30

Sujay Vikhe Patil: "मी कधीच शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही, यापुढे माझ्या तोंडून शिवसेनेवर टीका होणार नाही."

Sujay Vikhe Patil: 'Even if the party takes action, it will support Shiv Sena', says MP Sujay Vikhe | Sujay Vikhe Patil: 'पक्षाने कारवाई केली तरी शिवसेनेलाच साथ देणार', खासदार सुजय विखे असं का म्हणाले..?

Sujay Vikhe Patil: 'पक्षाने कारवाई केली तरी शिवसेनेलाच साथ देणार', खासदार सुजय विखे असं का म्हणाले..?

googlenewsNext

अहमदनगर: भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील मतभेद प्रचंड वाढले आहेत. दोन्ही पक्षातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करताना दिसतात. पण, अहमदनगरमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. नगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी शिवसेनेला साथ देणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. 

'पक्षाने कारवाई केली तरी चालेल'
पारनेर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुजय विखे बोलत होते. ''राज्यात परिस्थिती काहीही असो, पण नगर जिल्ह्यात णी शिवसेनेसोबत राहणार. केवळ पारनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी एकनिष्ठ राहील. जेव्हा केव्हा शिवसेनेवर संकट येईल, तेव्हा मी या नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांना एकटे सोडणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल," असे सुजय विखे म्हणाले.

'शिवसेनेवर कधीही टीका करणार नाही'
ते पुढे म्हणतात की, "असं थेट बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. मी येथील राजकारण ओळखतो. येथे विचारांचा वारसा आहे. तो वारसा टिकविण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहे. यावर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे मला सांगता येणार नाही. मात्र, शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल. येणाऱ्या काळात कोणाची कशी आघाडी होणार हे माहिती नाही. मात्र, मी मात्र शिवसेनेसोबत राहण्यास ठाम आहे. यापुढे माझ्या तोंडून कधीही शिवसेनेवर टीका होणार नाही, याची ग्वाही देतो ", असेही ते म्हणाले.

'शिवसेनेने सावध व्हावे'
यावळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, "मी खासदार म्हणून निवडून येण्यात 50 टक्के वाटा येथील शिवसेनेचा आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळेच गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. माझे आजही हेच मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेच्या निकालावरुन ते पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे" असंही विखे म्हणाले.

Web Title: Sujay Vikhe Patil: 'Even if the party takes action, it will support Shiv Sena', says MP Sujay Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.