दिशादर्शक फलकामध्ये सुरकंडी गावाला केले सुकंडी!
By admin | Published: October 21, 2016 05:13 PM2016-10-21T17:13:48+5:302016-10-21T17:13:48+5:30
या फलकामधये चक्क गावाचे नाव चुकविले आहे. या फलकामध्ये सुरकंडी ऐवजी सुकंडी असा उल्लेख केल्याने नवीन प्रवाशांची दिशाभूल होत आहे.
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २१ : वाशीम - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वेगेटजवळ सुरकंडी फाट्याच्या दोन्ही दिशेने सुरकंडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आले आहेत. या फलकामधये चक्क गावाचे नाव चुकविले आहे. या फलकामध्ये सुरकंडी ऐवजी सुकंडी असा उल्लेख केल्याने नवीन प्रवाशांची दिशाभूल होत आहे.
वाशीम- हिंगोली महामार्गावरील रेल्वेगेटजवळून पूर्वेकडे एक मार्ग जाते. तेथून काही अंतराने सुरकंडी, मोहगव्हाण व एक मार्ग देवाळाकडे जातो.
या मार्गावर आजपर्यत कुठेही गावाचे नाव दर्शविणारा दिशादर्शक फलक नव्हता. मात्र गत आठवड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिशादर्शक फलक उभारले, मात्र त्यामध्ये इतर गावांचा उल्लेख न करता केवळ सुरकंडी गावाची दिशा दर्शविणोर फलक उभारले. सदर फलक स्थानिक एजन्सीकडून न बनविता बाहेर राज्यातून बनविण्यात आल्यामुळे जिल्हयात अनेक फलक चुकीचे बनविण्यात आल्याची चर्चा आहे.