सुला फेस्टमध्ये संगीतावर थिरकली तरुणाई(फोटो स्टोरी)
By Admin | Published: February 6, 2017 06:36 PM2017-02-06T18:36:46+5:302017-02-06T18:36:46+5:30
'सुला फेस्ट'मध्ये सहभागी होत थंड हवेच्या शीत लहरींच्या साथीने देश-विदेशातील विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला.
नामदेव भोर/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 6 - जगभरातील संगीतप्रेमींसह विविध प्रकारच्या द्राक्षांपासून बनलेल्या वाईनच्या चाहत्यांनी यावर्षी 'सुला फेस्ट'मध्ये सहभागी होत थंड हवेच्या शीत लहरींच्या साथीने देश-विदेशातील विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतला. शुक्रवारपासून (दि.३) सुरू झालेला हा महोत्सव यंदा तीन दिवस चालला.
महोत्सवातील विविध प्रकारच्या संगीतावर तरुणाई थिरकली. सुला फेस्टमध्ये सलग तीनही दिवस अँफी थिएटरसह विविध म्युझिक बँडने दिलेल्या लाइव्ह परफॉर्मन्सवर देश-विदेशातील पर्यटकांनी ठेका धरला. त्याचप्रमाणे दुसऱ्या मंचावर जॅझ म्युझिक व सर्व फास्ट म्युझिक व तिसऱ्या मंचावर फ्युजन म्युझिक आदी विविध प्रकारच्या पाश्चिमात्य संगीताची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली.
यावेळी सुला फेस्टसाठी बांबू, पक्ष्यांची घरटी, बांबूचे झुलते मनोरे यारख्या अधिकाधिक नैसर्गिक वस्तूंपासून सजावट करण्यावर भर दिला गेला होता. यावर्षी एक दिवस जास्त असल्याने पर्यटकांची संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
(छायाचित्र- राजू ठाकरे)