सुमनताई नाईक यांचे निधन
By admin | Published: October 26, 2014 01:07 AM2014-10-26T01:07:33+5:302014-10-26T01:07:33+5:30
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या पत्नी सुमनताई सुधाकरराव नाईक यांचे हृदयविकाराने शुक्रवारी सायंकाळी 6.3क् वाजता पुसद येथे निधन झाले.
Next
पुसद (जि. यवतमाळ) : जलसंधारणाचे प्रणोते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या पत्नी सुमनताई सुधाकरराव नाईक यांचे हृदयविकाराने शुक्रवारी सायंकाळी 6.3क् वाजता पुसद येथे निधन झाले. त्या 8क् वर्षाच्या होत्या. शनिवारी गहुली येथील सुधाकरराव नाईक यांच्या समाधीनजीक शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत सुमनताई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सवरेदयी विचाराचा प्रभाव असलेल्या सुमनताई या बंजारा समाजातील जुन्या पिढीतील समाजसुधारक बळीराम पाटील (मांडवी) यांच्या कन्या होत्या. त्यांचे शिक्षण वर्धा येथे झाले. सुधाकरराव नाईक यांच्याशी त्यांचा विवाह 9 सप्टेंबर 1959 रोजी झाला होता. सुधाकरराव नाईक यांच्यामुळे त्यांना साहित्य व ललित कलेची गोडी लागली होती.
गेल्या वर्षभरापासून त्या हृदयाच्या आजाराने पीडित होत्या. मुंबई येथील लिलावती व हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मात्र उपचाराचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर त्यांना पुसद येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी 6.3क् वाजता हृदयविकाराचे दोन तीव्र झटके आले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचे पार्थिव पुसद येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर गहुली येथील सुधाकरराव नाईक
यांच्या समाधीनजीक सुमनताई
यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे
मुलगा जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जय नाईक, अर्चना यशवंत चव्हाण, आराधना अशोक नाईक या दोन विवाहित कन्या आहे. (वार्ताहर)
कुटुंबातील
ज्येष्ठ सदस्य हरविला
जलक्रांतीचे प्रणोते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या सहधर्मचारिणी सुमनताई नाईक यांच्या निधनाने आमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य हरविला. दर्डा आणि नाईक परिवाराचे ऋणानुबंध वर्षानुवर्षाचे आहेत. बाबूजी आणि वसंतराव नाईक साहेबांची घनिष्ठ मैत्री होती. सुधाकरराव हे बाबूजींना लहान भावासारखे होते. एकमेकांचे कुटुंब सुखदु:खात सोबत असायचे. सुमनताई यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख याच ऋणानुबंधातून झाली. त्या कायमच्या आमच्या परिवारासाठी ज्येष्ठ सदस्य म्हणून होत्या. असे हे सोज्वळ व्यक्तिमत्व आमच्यातून कायमचे निघून गेले. ती कधीही भरुन न निघणारी हानी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
- विजय दर्डा, खासदार, चेअरमन लोकमत मीडिया प्रा.लि.