सुमारतेची टीका ‘निरर्थक’ , साहित्य माहित नाही म्हणून बोलणे चुकीचे - लक्ष्मीकांत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 02:44 AM2017-12-11T02:44:37+5:302017-12-11T02:45:06+5:30

लेखकाच्या साहित्यावर टीका केली तर समजू शकतो. पण केवळ लोकांना त्यांचे साहित्य माहीत नाही म्हणून लेखकांना‘सुमार’ ठरवणे हे योग्य नव्हे. लोक वाचत नाहीत हा दोष लेखकाचा नाही. लोकप्रियता आणि वाडमयता या दोन गोष्टींमध्ये जमिन-आस्मानाचा फरक आहे.

 Sumatte's criticism is 'pointless'; It is wrong to say that literature is not known - Laxmikant Deshmukh | सुमारतेची टीका ‘निरर्थक’ , साहित्य माहित नाही म्हणून बोलणे चुकीचे - लक्ष्मीकांत देशमुख

सुमारतेची टीका ‘निरर्थक’ , साहित्य माहित नाही म्हणून बोलणे चुकीचे - लक्ष्मीकांत देशमुख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लेखकाच्या साहित्यावर टीका केली तर समजू शकतो. पण केवळ लोकांना त्यांचे साहित्य माहीत नाही म्हणून लेखकांना‘सुमार’ ठरवणे हे योग्य नव्हे. लोक वाचत नाहीत हा दोष लेखकाचा नाही. लोकप्रियता आणि वाडमयता या दोन गोष्टींमध्ये जमिन-आस्मानाचा फरक आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षांवर होणारी सुमारतेची टीका ही निरर्थक आणि अजाणतेपणातून होणारी आहे,अशा शब्दात नवनिर्वाचित अध्यक्ष माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी संमेलनाध्यक्षांवर ‘सुमार’तेचा ठपका ठेवणा-या टीकाकारांचा समाचार घेतला.
बडोदा येथे होणा-या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांच्या गळ्यात विजयाची माळ पडल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी पसरताच देशमुख यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह साहित्य-प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन केले. देशमुख यांची पत्नी अंजली देशमुख यांनी पेढा भरवत त्यांना शुभेच्छा दिल्या. देशमुख यांनी लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला पुुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, अक्षयकुमार काळे यांनी आपल्या लेखनातून साहित्यसंपदा समृद्ध केली, असे असतानाही संंमेलनाध्यक्षांवर ‘सुमार’तेचा ठपका ठेवण्यात आला, त्याविषयी छेडले असता देशमुख यांनी टीकाकारांनाच लक्ष्य करीत माजी संंमेलनाध्यक्षांची पाठराखण केली.
ते म्हणाले, लेखक हा लोकप्रिय नसतो. तो लेखनामधून आपले विचार लोकापर्यंत पोहोचवत असतो. आपल्या परीने तो साहित्यामध्ये स्वत:चे योगदान देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र लेखकांचे साहित्य लोक वाचत नाहीत हा दोष त्यांचा नसतो. त्यांची पुस्तक न वाचता केलेली टीका किती मान्य करायची हा प्रश्न आहे. त्यामुळे सुमारतेची केली जाणारी टीका ही निरर्थक आणि अजाणतेपणाची केली जात असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले.

निमंत्रितांनी मानधन घेऊ नये, या आयोजकांच्या आवाहनाला पाठिंबा
साहित्य संमेलनात सहभागी होणाºया निमंत्रितांनी मानधन घेऊ नये असे आवाहन आयोजक संस्थेने केले आहे. हा विषय सध्या साहित्यवर्तुळात चांगलाच गाजत आहे. मात्र संमेलन कमी खर्चात व्हावे अशी आयोजकांची भावना आहे. ज्या साहित्यिकांना शक्य आहे त्यांनी आपणहून मानधन नाकारायला हवे असे सांगून देशमुख यांनी आयोजकांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शविला.

बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी करणार

मराठी भाषेचा प्रश्न हा गंभीर बनला आहे. मराठी भाषा जगवायची असेल तर एका पिढीतून दुसºया पिढीमध्ये मराठीचा प्रसार होणे आवश्यक आहे. त्यामुळे बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्याची मागणी शासनाकडे करणार आहे. तसेच बृहन्महाराष्ट्र भाषा विभाग स्थापन करणे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविलाच पाहिजे
संमेलनाध्यक्ष कोणत्याही प्रश्नासंदर्भात व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवताना दिसत नाहीत, याबद्दल विचारले असता व्यवस्थेविरुद्ध बोलल्यामुळेच प्रशासकीय अधिकारी असताना चारदा बदलीला सामोरे जावे लागले, यातच सगळे आले अशी मिश्कील टीप्पणी देशमुख यांनी केली. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. विवेकवादी लोकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे. विवेकवादी पद्धतीने चिकित्सा करून आपले प्रश्न मांडता आले पाहिजेत.

संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद आहे. अर्ज भरल्यापासूनच मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे विजयाची आशा होती. माझ्यावर मतदारांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. संमेलनाध्यक्ष हे अत्यंत मानाचे पद आहे. मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे.
- लक्ष्मीकांत देशमुख

लक्ष्मीकांत देशमुख यांचा अल्पपरिचय

जन्म : ५ सप्टेंबर १९५४
४मूळगाव; मुरूम, ता.उमरगा, जि.उस्मानाबाद, सध्या- मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे
४शिक्षण: एम. एस्सी (केमिस्ट्री)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एम. ए. (मराठी साहित्य)- शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर, एमबीए (पब्लिक पॉलिसी)- इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मँनेजमेंट, बँगलोर (आय आय.एम) सर्टिफिकेट कोर्स इन इंटरनॅशनल पॉलिसी-सिरँक्युस युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क अमेरिका
४करिअर : भारतीय प्रशासन सेवा. माजी सनदी अधिकारी, माजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर, माजी एम.डी फिल्मसिटी, गोरेगाव मुंबई
४सध्या शैक्षणिक सल्लागार- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक, विश्वस्त-श्री ज्ञानेश्वर संस्थान समिती आळंदी
४साहित्य संपदा :
४कादंबरी : सलोमी ( दोन लघु कादंब-या) होते कुरूप वेडे, अंधेरनगरी, आॅक्टोपस, इन्किलाब विरुद्ध जिहाद आणि हरवलेले बालपण
४कथासंग्रह : कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, पाणी! पाणी!!, नंबर वन, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, अग्नीपथ आणि मृगतृष्णा
४नाटके/ बालनाटके :
४अखेरची रात्र आणि दूरदर्शन हाजिर हो...
४ललितेतर साहित्य : प्रशासननामा, बखर भारतीय प्रशासनाची, अविस्मरणीय कोल्हापूर, मधुबाला ते गांधी
४संपादित : लक्षदीप (लक्ष्मीकांत देशमुख यांचे निवडक साहित्य), अन्वयार्थ
(लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समग्र समीक्षा) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम
४इंग्रजी साहित्य : द रिअल हिरो अँड अदर स्टोरीज, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन्स गुड अँड ग्रेटनेस आणि करिष्मँटीक कोल्हापूर
४हिंदी साहित्य : खोया हुआ बचपन ( प्रकाशनाच्या मार्गावर)
४स्फुट साहित्य : नाती जपून ठेवा (नातेसंबंधावरील लेखमाला) आणि बी पॉझिटिव्ह (लेखमाला)
४पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य पुरस्कार, साहित्यदीप पुणे पुरस्कार, प्रेरणा आर्ट फौंडेशन कलागौरव पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार, नँसकॉम सोशल इंपँक्ट अँवार्ड -सेव्ह द बेबी गर्ल आय.टी साठी पुरस्कार, टाईम्स आॅफ इंडिया सोशल आॅनर अँवार्ड, आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार
४दुसºया शासकीय कर्मचारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष( २0१0), तिसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन , नागपूर (२0११), तिसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन, अध्यक्ष, नागपूर (२0११), पहिले डोंगरगाव जि.सांगली लोकजागर साहित्य संमेलन, अध्यक्ष (२0१५), ३८ वे मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड, फेब्रुवारी (२0१५)

Web Title:  Sumatte's criticism is 'pointless'; It is wrong to say that literature is not known - Laxmikant Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.