VIDEO- परिश्रमाच्या बळावर बहरविला उन्हाळी तीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 10:25 PM2017-05-09T22:25:23+5:302017-05-09T22:25:23+5:30
ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. 9 - मोहरी येथे परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या बळावर कारंजा तालुक्यातील गायवळच्या शेतकऱ्याने उन्हाळी तीळ फुलविण्याची ...
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 9 - मोहरी येथे परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या बळावर कारंजा तालुक्यातील गायवळच्या शेतकऱ्याने उन्हाळी तीळ फुलविण्याची किमया केली आहे. अतिशय उत्तम स्थितीत असलेले त्यांच्या शेतातील तिळाचे पीक लोकांचे लक्ष वेधत आहे.
गायवळ येथील सागर चौधरी यांच्याकडे मंगरुळपीर तालुक्यातील पारवा शिवारात तीन एकर शेती आहे. या शेतीमध्ये परिश्रम करून सोयाबीन, तूर अशी पिके घेत ते आपल्या कुटुंबाचे उदरभरण करतात. त्यांच्या शेतात विहीरही खोदली असून, खरिपाची पिके काढल्यानंतर ते भाजीपाला किंवा इतर पिके घेतात. यंदा त्यांनी सोयाबीन आणि तुरीचे पिकं घेतल्यानंतर या शेतामधील दोन एकर क्षेत्रावर उन्हाळी तिळाची पेरणी केली.
खताचे योग्य नियोजन आणि पाण्याचा प्रभावी वापर तसेच इतर बाबींची काळजी घेतल्याने हे पीक चांगलेच बहरले आहे. एकरी सहा क्विंटलप्रमाणे 12 क्विंटल किमान उत्पादन होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उन्हाळी पिकांत कमी वेळेचे आणि कमी खर्चात येणाऱ्या तिळाच्या या पिकातून त्यांना दीड लाखांचे उत्पन्न होण्याची खात्री आहे.