उन्हाळ्याची चाहूल
By Admin | Published: February 19, 2016 01:45 AM2016-02-19T01:45:32+5:302016-02-19T01:45:32+5:30
राज्यातून थंडी गायब झाल्याने तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून गुरुवारी ३७.८ अंश सेल्सिअस तापमान मालेगाव येथे नोंदविण्यात आले.
पुणे : राज्यातून थंडी गायब झाल्याने तापमानात वेगाने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून गुरुवारी ३७.८ अंश सेल्सिअस तापमान मालेगाव येथे नोंदविण्यात आले. त्याचबरोबर विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा ३५च्या वर गेला असून सर्वाधिक उन्हाच्या झळा विदर्भाला जाणवण्यास सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. राज्यात गुरुवारी सर्वात कमी तापमान पुण्यात नोंदविण्यात आले. पुण्याचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस होते. मालेगाव, ब्रह्मपुरी, नांदेड येथे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या वर आहे. पुणे, नाशिक, सांगली, औरंगाबाद येथेही तापमानात वाढ झाली असून, पारा ३५ अंशावर गेला आहे. येत्या सप्ताहातही तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. राज्यातून थंडी गायब झाली असून, उन्हाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.