विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:31 AM2023-04-04T10:31:44+5:302023-04-04T10:32:09+5:30

School Summer Vacation : या पत्रकात दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे.

Summer vacation announced for schools, circular issued by education department | विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी 

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी 

googlenewsNext

मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळांना 2 मे ते 11 जूनपर्यंत यंदा उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे. त्यानंतर पुन्हा 12 जूनपासून शाळा सुरू होईल. तर विदर्भात मात्र, 26 जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

या पत्रकात दिलेल्या निर्देशानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. 2 मे पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी ही 11 जून पर्यंत असणार आहे.  तर राज्यभरातील नव शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून म्हणजेच 12 जून पासून सुरू केले जाणार आहे. तर विदर्भातील उन्हाळा लक्षात घेता त्या भागातील नवं शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या चौथ्या सोमवार पासून म्हणजेच 26 जून पासून सुरू होणार आहे. 

इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांना 30 एप्रिल रोजी किंवा त्यानंतर उन्हाळी सुट्टीच्या काळात जाहीर करता येणार आहे. हा निकाल संबंधित विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शाळांची असणार आहे. शाळातून उन्हाळी किंवा दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून नाताळ किंवा गणेशोत्सव दरम्यान समायोजन करण्याचे अधिकार शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने देण्यात येणार आहे. 

याचबरोबर, शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या 76 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी, असं सुद्धा परिपत्रकात म्हटलं आहे. शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.

स्कूल बस शुल्कात वाढ करण्याचा निर्णय
आगामी शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या शुल्कात मोठी वाढ होणार आहे. स्कूल बस असोसिएशनने दरवाढीचा निर्णय घेतला असून 15 ते 20 टक्के दरवाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या बसेसचे शुल्क वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे आता पालकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. 

Web Title: Summer vacation announced for schools, circular issued by education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.