उन्हाळ्यात हिवाळा : महाशिवरात्रीपर्यंत थंडी, गारपिटीची शक्यता नाही; नंतर तापमान वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 08:33 AM2024-03-05T08:33:53+5:302024-03-05T08:34:26+5:30

मुंबईसह राज्यभरात महाशिवरात्रीपर्यंत थंडी कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Summer Winter : Cold till Mahashivratri, no chance of hail; Then the temperature will rise | उन्हाळ्यात हिवाळा : महाशिवरात्रीपर्यंत थंडी, गारपिटीची शक्यता नाही; नंतर तापमान वाढणार

उन्हाळ्यात हिवाळा : महाशिवरात्रीपर्यंत थंडी, गारपिटीची शक्यता नाही; नंतर तापमान वाढणार

मुंबई : राज्यात अनेक भागात उन्हाचे चटके वाढायला सुरुवात झालेली असतानाच आता पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊन थंडी वाजू लागली आहे. दिवसा चटके देणारे ऊन आणि रात्री पडणारी आल्हाददायक थंडी, अशा दुहेरी वातावरणाला सामोरे जावे लागत  आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यभरात महाशिवरात्रीपर्यंत थंडी कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जळगाव, नाशिक, मुंबई, पुणे शहरातील व लगतच्या परिसरात व जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १२-१३ तर दुपारचे कमाल तापमान २८-३० अंश सेल्सिअसदरम्यान आहे. हे तापमान सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने कमी आहे. मुंबईचे तापमान १९ अंश सेल्सिअस आहे. विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण निवळले आहे. पावसाची किंवा गारपिटीची शक्यता नाही. विदर्भात तीन दिवस ढगाळ वातावरण राहील. 
 

Web Title: Summer Winter : Cold till Mahashivratri, no chance of hail; Then the temperature will rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान