खडसे बदनामीप्रकरणी दमानियांसह मेमन यांना समन्स

By admin | Published: July 12, 2016 05:40 PM2016-07-12T17:40:32+5:302016-07-12T17:40:32+5:30

समाजसेविका अंजली दमानिया व आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांना न्यायालयाने समन्स काढले आहेत.

Summons with Damania, along with Damania for Khadse defamation case | खडसे बदनामीप्रकरणी दमानियांसह मेमन यांना समन्स

खडसे बदनामीप्रकरणी दमानियांसह मेमन यांना समन्स

Next

ऑनलाइन लोकमत
मुक्ताईनगर, दि. 12-  माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून एकनाथराव खडसे व भाजप पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर समाजसेविका अंजली दमानिया व आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांना न्यायालयाने समन्स काढले आहेत. 
भाजपाच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले यांनी अंजली दमानिया व प्रीती मेनन यांच्याविरुद्ध १८ जून रोजी मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केला होता. मागील तारखेत याचिकाकर्ते यांनी दमानिया व मेनन यांच्या पत्रकार परिषद व त्यातून मुद्रीत झालेल्या बातम्या वृत्त वाहिन्यावर झळकलेले बातम्यांचे व्हिडीओ सीडी न्यायालयात सादर केले होते. यावर १२ रोजी न्यायालयाने दोन्ही महिलांना येत्या ६ आॅगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स काढले आहे. याचिकाकर्ता रमेश ढोले यांनी ही माहिती दिली.

Web Title: Summons with Damania, along with Damania for Khadse defamation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.