सनई-चौघड्यांचे ‘सूर’; सव्वा कोटी वसूल

By admin | Published: January 12, 2016 12:48 AM2016-01-12T00:48:26+5:302016-01-12T00:48:26+5:30

जिल्हा बॅँक वसुली मोहीम : ‘इंदिरा’, ‘बिजोत्पादक’ने दिले धनादेश; ‘गायकवाड’ सोमवारी पाच कोटी भरणार

Sun-Chougades' 'Sur'; Revenues collected | सनई-चौघड्यांचे ‘सूर’; सव्वा कोटी वसूल

सनई-चौघड्यांचे ‘सूर’; सव्वा कोटी वसूल

Next

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकांनी गांधीगिरी पध्दतीने केलेल्या मोहीमेला काही प्रमाणात यश आले. ‘इंदिरा’ कारखान्याने १ कोटी १६ लाख, तर बिजोत्पादक संघाने पाच लाखाचे धनादेश बॅँकेकडे दिले. उदयसिंगराव गायकवाड कारखान्याच्या थकबाकीतील पाच कोटी सोमवारपर्यंत, तर तंबाखू संघाचे डॉ. संजय पाटील यांनी शेतीमाल प्रक्रिया संस्था वगळता उर्वरित चार संस्थांची थकबाकी भरण्याची तयारी दाखवली आहे. सनईचौघड्याचा गजर, दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन संचालक दारात गेल्याने थकबाकीदार चांगलेच हबकले.
जिल्हा बॅँकेने बड्या थकबाकीदाराविरोधात मोहीम उघडली आहे. सोमवारी सनईचौघड्यासह बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने दुपारी एक वाजता गायकवाड कारखान्याचे मानसिंगराव गायकवाड यांच्या ताराबाई पार्क येथील घरावर मोर्चा नेला. गुलाबपुष्प देऊन आमदार मुश्रीफ यांनी मानसिंगराव गायकवाड यांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले. कारखाना चालविण्यास घेतलेले ‘अथणी’ शुगर्सचे श्रीमंत पाटील यांच्या मुलाशी आमदार मुश्रीफ यांनी फोनवरून चर्चा केली. त्यांनी सोमवारपर्यंत पाच कोटी रुपये भरण्याची तयारी दाखवली.
संचालकांनी त्यानंतर ‘इंदिरा’ कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई यांच्या रमणमळा येथील घरावर मोर्चा वळविला. देसाई घरी नसल्याने अध्यक्ष मुश्रीफ यांनी फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला. आपण बॅँकेत आल्याचे सांगितल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण हे चर्चेसाठी बॅँकेत गेले. बॅँकेतून निरोप येईपर्यंत आमदार मुश्रीफ व संचालक तिथेच तळ ठोकून होते. देसाई यांनी बॅँकेत येऊन १ कोटी १६ लाखांचा धनादेश दिला. जिल्हा बिजोत्पादक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या ताराबाई येथील निवासस्थानी सनई चौघड्यासह संचालक दाखल झाले. एकरकमी परतफेड योजनेंतर्गत ६२ लाख रुपये होतात, त्यापैकी ५ पटरक्कम आता भरण्याची मागणी संचालकांनी पाटील यांच्याकडे केली. पण संघाची मार्केट यार्ड येथील ९ हजार चौरस फूट जागा बापूसाहेब पाटील यांना विक्री केली असताना त्यांनी ११ हजार चौरस फुटाचा ताबा घेतला आहे. त्यांच्याकडील २ हजार चौरस फूट जागा विक्री करून बॅँकेचे पैसे भरण्याची तयारी पाटील यांनी दाखवली. पण तोपर्यंत ५ लाख रुपये भरा, असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. बऱ्याच चर्चेनंतर पाच लाख रुपयांचा धनादेश पाटील यांनी संचालकांकडे सुपूर्द केला.
डॉ. संजय पाटील यांच्या रुक्मिणीनगर येथील निवासस्थानी संचालक गेले. पाटील हे मुंबई येथे असल्याने त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. महाराष्ट्र टोबॅको फेडरेशन, मयूर वाहतूक, एस. के. पाटील बॅँक, तंबाखू खरेदी विक्री संघ या चार संस्थांची थकबाकी भरण्यास तयार आहे. पण शेतीमाल प्रक्रिया संस्थेच्या माध्यमातून अडीच कोटी परस्पर उचलल्याबद्दल बॅँकेने आपणावर दावा दाखल केल्याने त्याबाबत चर्चा करणार नसल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
वसुली पथकात उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक निवेदिता माने, पी. जी. शिंदे, प्रा. जयंत पाटील, भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अनिल पाटील, विलासराव गाताडे, उदयानी साळुंखे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, आसिफ फरास, संतोष पाटील, आदी सहभागी झाले होते.


अडीच महिन्यांत सव्वा दोन कोटींची वसुली
गेल्या अडीच महिन्यांत १७ संस्थांनी ओटीएसअंतर्गत ५ ते २५ टक्क्यांपर्यंत रक्कम भरली आहे. ओटीएसअंतर्गत या संस्थांकडून १४ कोटी ६८ लाख ७६ हजार रुपये रक्कम येणे होते. त्यापैकी २ कोटी २७ लाख १७ हजार रुपये वसूल झालेले आहेत. या संस्थाची वसुली खालीलप्रमाणे :
संस्थायेणेबाकीओटीएसअंतर्गत रक्कमभरलेली रक्कम
कोल्हापूर अर्बन सोसायटी ४९ लाख २९ हजार१५ लाख ४७ हजार३ लाख ९० हजार
कालिमाता यंत्रमाग (इचलकरंजी)३१ लाख ७१ हजार१९ लाख ३६ हजार५ लाख
डेक्कन टेक्सस्टाईल (इचलकरंजी)३ कोटी ४४ लाख७५ लाख १४ हजार४ लाख ५० हजार
इंदिरा पतसंस्था (कागल)१ कोटी ४१ लाख५८ लाख ७७ हजार३ लाख
राधानगरी भाजीपाला (राशिवडे)४३ लाख ९२ हजार३८ लाख १५ हजार१ लाख ३० हजार
रत्नाप्पाण्णा पाणीपुरवठा (कसबा सांगाव)-१६ लाख ७२ हजार१ लाख ८० हजार
कृष्णगंगा दूध (पुंगाव)-२ लाख ६९ हजार२० हजार
वाहनधारक पतसंस्था२ कोटी ५ लाख८८ लाख ७० हजार ४ लाख २० हजार
महालक्ष्मी दूध संघ४ कोटी ८५ लाख२ लाख ७० हजार१५ लाख
धनलक्ष्मी पतसंस्था (निढोरी)६६ लाख ९२ हजार३ लाख ६६ हजार ३२ हजार
कोल्हापूर खरेदी-विक्री संघ९१ लाख २२ हजार३३ लाख ४० हजार१ लाख
पंत वस्त्रोद्योग (तिळवणी)३ कोटी ४ लाख१ कोटी ४७ लाख ५० लाख
पश्चिम भुदरगड पतसंस्था (कडगाव)१ कोटी ८४ लाख८४ लाख ८९ हजार४ लाख
राजीव गांधी पतसंस्था (सांगाव)२९ लाख ५९ हजार-१ लाख ७५ हजार
बीजोत्पादक संघ१ कोटी २७ लाख६२ लाख २ हजार५ लाख
शंकर-पार्वती पतसंस्था (गंगापूर) १ कोटी ६८ लाख९१ लाख ४० हजार१० लाख २० हजार
विजयमाला देसाई ऊस तोडणी ९ कोटी ४० लाख४ कोटी ६० लाख१ कोटी १६ लाख


‘पी.जीं.’नी धरले मानसिंगरावांचे पाय
बॅँकेचे संचालक पी. जी. शिंदे यांनी दारात जाताच मानसिंगराव गायकवाड यांचे पाय धरले. ‘बाबा आम्हाला एवढे यातून सोडव’ अशी विनंती केल्याने उपस्थित संचालकांसह कर्मचारी चांगलेच अवाक् झाले.


संजय पाटलांच्या दारात माने वहिनी पुढे
निवेदिता माने व डॉ. संजय पाटील तर मानसिंगराव गायकवाड व सर्जेराव पाटील-पेरीडकर यांचे राजकीय सख्य जगजाहीर आहे. गायकवाड यांच्या दारात वसुलीसाठी पेरीडकर जाणार का? याविषयी उत्सुकता होती, पण ते आले नाहीत. माने या मात्र पाटील यांच्या निवासस्थानाच्या दारात संचालकांच्या अगोदरच हजर होत्या.
वसंतराव पाटील कुक्कुटपालन संस्थेची ओटीएसनुसार ४ कोटी २५ लाख रुपये बाकी आहे. संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवूनही त्याची किंमत ५० लाख होते.


विजयमाला देसाई भडकल्या
आपण बॅँकेत आले असताना संचालक मंडळ घरावर मोर्चा घेऊन गेलेच कसे? अशी विचारणा विजयमाला देसाई यांनी केली. आम्ही तुमचे कर्ज बुडविणार आहे काय? असे इंग्रजीतून संवाद साधल्याने अध्यक्ष मुश्रीफही गोंधळून गेले.

संस्थेचे नावएकूण थकबाकीतडजोड रक्कमभरलेली रक्कम
बिजोत्पादक संघ१ कोटी २७ लाख६२ लाख २ हजार५ लाख
विजयमाला देसार्ई ऊस तोडणी९ कोटी ४० लाख४ कोटी ६० लाख१ कोटी १६ लाख

Web Title: Sun-Chougades' 'Sur'; Revenues collected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.