राज्यातील उन्हाचा कडाका कायम
By admin | Published: March 5, 2017 01:02 AM2017-03-05T01:02:30+5:302017-03-05T01:02:30+5:30
राज्यात उन्हाचा कडाका कायम असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा कमाल पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. शनिवारी राज्यात स
पुणे : राज्यात उन्हाचा कडाका कायम असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा कमाल पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. शनिवारी राज्यात सर्वाधिक ३७.९ अंश सेल्सिअस तापमान अकोल्यात नोंदविण्यात आले.
कोकण किनारपट्टी परिसरातील वातावरणातील उष्मा कमालीचा वाढला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानातही वाढ झाली आहे. अकोल्यातील किमान तापमान १९, तर कमाल तापमान ३७.९ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. अमरावती येथे ३६, तर किमान तापमान १८, बुलडाण्यात ३५.२, तर किमान तापमान १९.६ अंश सेल्सिअसवर गेले आहे. चंद्रपुरातील पारा ३६.८ असून, किमान तापमानही २० अंश सेल्सिअस असल्याने उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागपूरातील कमाल तापमान ३६.२, वाशिम ३३.८, वर्धा ३७.२ आणि यवतमाळचे तापमान ३५.८ अंश सेल्सिअसवर पोचले आहे.
मराठवाड्यातील औंरगाबादचा पारा ३४.६ अंश सेल्सिअसवर आहे. परभणीत ३७, नगरमध्ये ३७.५, जळगाव ३५.६, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर ३२, मालेगाव ३६.८, सांगली ३७, सातारा ३५.६ आणि सोलापूरचा पारा ३७.२ अंश सेल्सिअसवर पोचला आहे.
सर्वात कमी तापमान नाशिकमध्ये १२.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. येथील कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस होता. पुण्यातील कमाल तापमान ३५, तर किमान तापमान १२.९ अंश सेल्सिअस होते. (प्रतिनिधी)