रविवारचे बाजार उठले

By admin | Published: June 5, 2017 12:59 AM2017-06-05T00:59:45+5:302017-06-05T00:59:45+5:30

शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’ आशा घोषणा देत पुणे जिल्ह्यात रविवारी चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आपली आंदोलनं कायम ठेवली

Sunday's market rose | रविवारचे बाजार उठले

रविवारचे बाजार उठले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘राज्य सरकारचं काम काय... शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाय’ आशा घोषणा देत पुणे जिल्ह्यात रविवारी चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आपली आंदोलनं कायम ठेवली. विशेष म्हणजे रविवारी असलेले सर्व आठवडेबाजार शेतकऱ्यांनी उठवले. यात कोणतेही व्यवहार होवू दिले नाहीत.
जिल्ह्यात रविवारी बहुतांश ठिकाणचे मोठे आठवडे बाजार होतात. त्यात आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील बाजार बंद ठेवण्यात आला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आठवडे बाजारामध्ये शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना गांधीगिरी करत गुलाबपुष्प देऊन शेतकऱ्यांच्या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उरुळी कांचन शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आले.
४आळेफाटा उपबाजारात कांदा विक्रीस न आणता संप सुरूच ठेवला. यामुळे उपबाजारात शुकशुकाट होता. दौंड तालुक्यातील केडगाव व खुटबावचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला. आज सकाळी व्यापारी बाजारात दाखल झाले, मात्र शेतकऱ्यांनी बाजारतळांवर जावून त्यांना विनंती केली. काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी ही विनंती मान्य केली व परत जाने पसंत केले.
४शिक्रापूर येथे दर रविवारी भरविला जाणारा आठवडेबाजार शेतकरी संपामुळे बंद ठेवण्यात आला होता; परंतु किरकोळ व्यापारी येथे बाजारात आले व बंद असलेला आठवडेबाजार सकाळी दहानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू करण्यात आला, मात्र शेतकऱ्यांनी आजच्या बाजाराकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले.
४नसरापूर येथील आठवडेबाजार आज तुरळक गर्दीचा ठरला. बाजारपेठेत बाहेर गावातून येणारे बाजारकरी आले नाहीत. पालेभाज्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणल्या नाहीत.
चौथ्या दिवशीही
भाजीमंडई बंद
इंदापूर येथे शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी रविवारी शहरातील रविवारचा आठवडेबाजार, भाजीमंडई बंद ठेवण्यात आली होती. माळवाडी नंबर दोनच्या युवा शेतकऱ्यांनी शहरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दूध व शेतीमाल ओतून दिला.
अहो, आता आम्हाला थोडासा त्रास पडेल. पालेभाज्या आम्ही टाकून देऊ. घरी खाऊ अगर जित्राबांना खायला घालू. चार दिवस चार पैसे घरी येणार नाहीत. तेही सहन करू... पण जोपर्यंत चांगलं होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही’
- विनायक कदम,
बेडशिंगे (इंदापूर) शेतकरी
ंंंबारामती-इंदापूर महामार्गावर
इंदापूर तालुक्यातील पाच गावांमधील शेतकऱ्यांनी शेतकरी संपामध्ये सहभागी होत रास्ता रोको आंदोलन केले.
या वेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर
दूध, फळे, कांदे फेकत आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत
आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
या वेळी शेतकऱ्यांनी केला.काही ठिकाणी मंबुई, पुणे व इतर जिल्ह्यात जात असलेला शेतीमाल रोखून धरला.
आज मालाची नासधूस करण्यापेक्षा त्या
वाहनांना परत माल जेथून आणला तिथे नेण्याची
विनंती केली. ज्या वाहनचालकांनी ही विनंती मानली नाही, त्यांचा माल रसत््यावर फेकून देण्यात आला.

Web Title: Sunday's market rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.