७ एप्रिलला राज्यात राबविणार सुंदर माझा दवाखाना उपक्रम

By स्नेहा मोरे | Published: April 1, 2023 04:07 PM2023-04-01T16:07:52+5:302023-04-01T16:08:08+5:30

जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार आहे

Sunder Maja Davakhana initiative will be implemented in the state on April 7 | ७ एप्रिलला राज्यात राबविणार सुंदर माझा दवाखाना उपक्रम

७ एप्रिलला राज्यात राबविणार सुंदर माझा दवाखाना उपक्रम

googlenewsNext

मुंबई - दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. सार्वजनिक आरोग्य विभागाने या निमित्त राज्यातील सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. आरोग्य सेवा अधिक सुंदर व स्वछ व लोकाभिमुख करण्यासाठी ७ ते १४ एप्रिल दरम्यान ‘ सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. 

जागतिक आरोग्य दिनाचे घोषकक्य संपूर्ण जगभरात समान आरोग्य सेवा सुविधांबद्दल जागरुकता पसरवणे आणि आरोग्याशी संबंधित सर्व गैरसमज दूर करणे हा आहे. यासोबतच, विविध  आरोग्यविषयक धोरणे तयार करण्यास आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यास  प्रवृत्त केले जाते. दरवर्षी यासाठी एक संकल्पना निश्चित केली जाते, यंदाच्या आरोग्य दिनाची संकल्पना “सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा, सर्वांसाठी आरोग्य!” ही आहे.

सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने धीरज कुमार यांनी सर्व जिल्ह्यना पत्राद्वारे “सुंदर माझा दवाखाना” हा उपक्रम राबविण्याविषयी सूचना केल्या आहेत. 

या उपक्रमांतर्गत आरोग्य संस्था व भोवतालचा परिसर, सर्व विभाग, स्वच्छतागृहे, भांडारगृहे इत्यादींची स्वच्छता करण्यात यावी, तसेच आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि आरोग्य संस्थेमार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या सेवांचे फलक लावण्यात यावेत, अशा सूचना आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी विभागीय उपसंचालक , जिल्हाशल्य चिकित्सक , जिल्हा  आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.

Web Title: Sunder Maja Davakhana initiative will be implemented in the state on April 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.