सुनीत जाधवचाच बोलबाला

By admin | Published: April 24, 2017 02:54 AM2017-04-24T02:54:40+5:302017-04-24T02:54:40+5:30

स्टार शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव याने पुन्हा एकदा आपला दबदबा राखताना तिसऱ्यांदा मानाची मुंबई महापौर श्री स्पर्धा जिंकली.

Suneet Jadhav | सुनीत जाधवचाच बोलबाला

सुनीत जाधवचाच बोलबाला

Next

मुंबई : स्टार शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव याने पुन्हा एकदा आपला दबदबा राखताना तिसऱ्यांदा मानाची मुंबई महापौर श्री स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात त्याने तिसऱ्यांदा या स्पर्धेवर वर्चस्व राखले. त्याचवेळी, त्याने यंदाचा मुंबई श्री ठरलेल्या अतुल आंब्रेचे आव्हान सहजपणे परतावून लावले. दरम्यान, अभिषेक खेडेकर याने आपल्या आकर्षकरीत्या शरीरयष्टीचे प्रदर्शन करताना बेस्ट पोझरचा किताब पटकावला.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना व मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या सहकार्याने शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने पार पडलेल्या या स्पर्धेत सुनीतचाच बोलबाला राहिला. ८० किलोवरील वजनी गटातून सहभागी झालेला सुनीत ज्यावेळी मंचावर आला, तेव्हाच स्पर्धेचा विजेता निश्चित झाला. सुनीतनेही आपल्या चाहत्यांना निराश न करताना सहजपणे वर्चस्व राखताना आपला आंतरराष्ट्रीय दर्जा सिद्ध केला. विशेष यंदा सर्वांचे लक्ष वेधलेल्या अतुल आंब्रेकडून सुनीतला मोठी स्पर्धा मिळण्याची शक्यता होती. परंतु, सुनीतच्या बलाढ्य शरीरयष्टीपुढे अतुलचा निभाव लागला नाही.
६० किलो वजनी गटात अनपेक्षित कडवी झुंज पाहण्यास मिळाली. या गटात मि. वर्ल्ड विजेता नितीन म्हात्रे संभाव्य विजेता होता. झालेही तसेच, परंतु यासाठी त्याला बरेच झुंजावे लागले. उमेश गुप्ता आणि विराज लाड यांनी जबरदस्त प्रदर्शन केल्यानंतर नितीनला दोघांसह कंपेरिझनसाठी उतरावे लागले. यावेळी मात्र नितीनने आपला अनुभव पणास लावत बाजी मारली.
त्याचप्रमाणे, ७० किलो वजनीगटात संतोष भरणकर याने लक्ष वेधताना अनुभवी विलास घडवले झुंजवले. मात्र, मोक्याच्यावेळी गुण गमावल्याचा फटका बसल्याने संतोषला गटउपविजेपदावर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)
गटनिहाय विजेते :-
५५ किलो गट : १. संदेश सकपाळ (परब फिटनेस), २. नितीन शिगवण (वक्रतुंड), 3. जितेंद्र पाटील (माँ साहेब).
६० किलो : १. नितीन म्हात्रे (पॉवर झोन), २. उमेश गुप्ता (क्रिएटर जिम), ३. विराज लाड ( बॉडी वर्पशॉप).
६५ किलो: १. बप्पन दास (आरकेएम), २. प्रदीप झोरे (माय फिटनेस), ३. उमेश पांचाळ (आर.एम.भट).
७० किलो : १. विलास घडवले (बॉडी वर्पशॉप), २. संतोष भरणकर (परब फिटनेस), ३. विशाल धावडे (बाल मित्र).
७५ किलो : १. प्रतिक पांचाळ (परब फिटनेस), २. लीलाधर म्हात्रे (आरकेएम), ३. राहुल तर्फे (बॉडी वर्पशॉप).
८० किलो : १. सुशील
मुरकर (आरकेएम ), २. अभिषेक खेडेकर (बॉड़ी वर्पशॉप), ३. गोपाळ फौजदार(बी आॅम).
८० किलोवरील : १. सुनीत जाधव (माय फिटनेस), २. अतुल आंब्रे (हरक्युलस जिम), ३. सत्यजीत प्रतिहारी (फिट फायटर).

Web Title: Suneet Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.