नोकरी सोडून समाजसेवा करणारा 'बुद्धू'!

By admin | Published: September 21, 2015 09:59 AM2015-09-21T09:59:25+5:302015-09-21T14:27:15+5:30

बुद्धू शब्द ऐकताच डोळ्यासमोर येते 'ढ' व्यक्ती. मात्र सिंदखडेराजा येथील बुद्धू आहे अपघातग्रस्तांचा देवदूत...

Sung Seva 'dumb' left the job! | नोकरी सोडून समाजसेवा करणारा 'बुद्धू'!

नोकरी सोडून समाजसेवा करणारा 'बुद्धू'!

Next

राजेश शेगोकार , बुलडाणा

बुद्धू.. हा शब्द ऐकताच समोर येतो एकदम 'ढ', ज्याला काही समजत नाही अशी व्यक्ती. पण सिंदखेडराजा याला अपवाद आहे. या गावात 'बुद्धू' असं कुणी म्हटलंच, तर समोर येतो अपघातग्रस्तांचा देवदूत! नोकरी सोडून रुग्णसेवेचा, समाजसेवेचा छंद जोपासणारा हा युवक आहे 'बुद्धू चौधरी.'
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे ऐतिहासिक स्थळ आहे. या मार्गावर पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती अकोलासारख्या मोठय़ा शहरांमध्ये जाणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असते. परिसरात कुठेही अपघात झाला, तर घटनास्थळी सर्वांत आधी पोहोचतो बुद्धू चौधरी. जखमींना तत्काळमदत देण्यासाठी त्याची धावपळ सुरू होते.
बुद्धूचे हे काम तो आठव्या वर्गात होता, तेव्हापासून सुरू आहे. तो शाळेत असताना चिंचेच्या झाडावरून एक विद्यार्थी खाली पडला. त्याच्याभोवती बघ्यांची गर्दी झाली; पण कुणीही हात लावायला तयार नव्हतं. तेव्हा आठव्या वर्गातील बुद्धूने त्या मुलाला उचलून थेट दवाखाना गाठला. दुर्दैवाने तो मुलगा दगावला; मात्र अपघातग्रस्तांना लोक मदत करत नाहीत, हे त्याच्या मनामध्ये कुठेतरी ठासून बसले. तेव्हापासून अपघात झाला की, तिथे बुद्धू धावत सुटतो. नावाने जरी बुद्धू असला, तरी हाच बुद्धू अपघातग्रस्तांचा जीवनदाता ठरला आहे.
विज्ञान शाखेचा पदवीधर असलेला बुद्घू मेहकर येथे एका संस्थेत नोकरीला लागला; मात्रअवघ्या सहा महिन्यांत त्याने नोकरी सोडली. आता घरची शेती आणि समाजकार्य हेच त्याचे ध्येय झाले आहे.. अन् अपघातग्रस्तांकडून व्यक्त होणारी कृतज्ञतेची भावना हीच बुद्धूची कमाई. 
'लोकजागर' परिवाराच्या माध्यमातून त्याची सुरू असलेली ही समाजसेवा परिसरासाठी कौतुकाचा अन् आदराचा विषय बनला आहे.

मनोरुग्णांसाठीही धडपड
सिंदखेडराजा परिसरात भीक मागून पोट भरणारे अनेक मनोरुग्ण आहेत. या मनोरुग्णांच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यापर्यंतची काळजी बुद्धू घेतो. त्यांना आंघोळ घालणे, त्यांच्यावर उपचार करणे यासाठी बुद्धूची धडपड असते. 'बुद्धू' कुठलेही बक्षीस घेत नाही. कुणालाही काम सांगत नाही. प्रथमोपचारच नव्हेतर; जखमेला टाके घालण्यापर्यंत सर्व काम तो करतो.
बुद्धूचं काम एवढय़ा लोकांपर्यंत पोहोचलं आहे, की अपघात झाल्याबरोबर पोलिसांसोबतच रुग्णालयातूनही बुद्धूूला सूचना दिली जाते. सूचना मिळाल्यावर बुद्धू असेल तेथून त्वरित धाव घेतो.

 

Web Title: Sung Seva 'dumb' left the job!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.