सुनील गावसकर व दिलीप वेंगसरकर संघांची दणदणीत आगेकूच

By admin | Published: May 18, 2016 05:57 AM2016-05-18T05:57:00+5:302016-05-18T05:57:00+5:30

सुनील गावसकर इलेव्हन संघाने सचिन तेंडुलकर इलेव्हनला एक डाव व ७६ धावांनी लोळवून २३ वर्षांखालील माधव मंत्री चषक क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली

Sunil Gavaskar and Dilip Vengsarkar teams are ahead in the match | सुनील गावसकर व दिलीप वेंगसरकर संघांची दणदणीत आगेकूच

सुनील गावसकर व दिलीप वेंगसरकर संघांची दणदणीत आगेकूच

Next


मुंबई : सुनील गावसकर इलेव्हन संघाने सचिन तेंडुलकर इलेव्हनला एक डाव व ७६ धावांनी लोळवून २३ वर्षांखालील माधव मंत्री चषक क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. अन्य सामन्यात दिलीप वेंगसरकर इलेव्हन संघाने आंध्र प्रदेश संघाला १२० धावांनी नमवले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून सचिन तेंडुलकर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र अतुल सिंग (६/४०) आणि एश्वर्य सुर्वे (३/१५) यांच्या भेदक माऱ्यापुढे तेंडुलकरचा डाव ८४ धावांत संपुष्टात आला. यानंतर वैदिक मुरकर (८०), विक्रांत औती (५५), प्रणव मेनन (४५) व सचिन यादव (३१) यांच्या जोरावर गावसकर संघाने २९७ धावांची मजल मारून २१३ धावांची मजबूत आघाडी घेतली.
यानंतर तेंडुलकर संघाचा डाव पुन्हा घसरला. मिनाद मांजरेकर (४/२६) व के. कोठारी (३/३८) यांनी अचूक मारा करत तेंडुलकर संघाला १३७ धावांत गुंडाळून गावसकर संघाच्या विजयावर शिक्का मारला. अजिंक्य पाटीलने (५२) तेंडुलकर संघाकडून एकाकी झुंज दिली.
बीकेसी येथे झालेल्या सामन्यात दिलीप वेंगसरकर संघाने आंध्र प्रदेशला १२० धावांनी नमवले. वेंगसरकर संघाने प्रथम फलंदाजी करताना २०० धावांवर डाव घोषित केला. कुशल धवणे (७३), आकाश आनंद (४०) व ध्रुमील मटकर (३९) यांनी चांगली फटकेबाजी केली. यानंतर आंध्रने २२० धावा फटाकावून २० धावांची आघाडी मिळवली. वेंगसरकरने यानंतर ७ बाद २४८ धावांवर डाव घोषित करून आंध्रला विजयासाठी २२९ धावांचे लक्ष्य दिले. या वेळी ध्रुमीलच्या (६/१७) भेदकतेपुढे आंध्रचा डाव केवळ १०८ धावांवर संपुष्टात आणला.

Web Title: Sunil Gavaskar and Dilip Vengsarkar teams are ahead in the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.