सुपर एक्सप्रेस वेने नागपूर - मुंबई १० तासांत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
By admin | Published: July 31, 2015 08:07 PM2015-07-31T20:07:14+5:302015-07-31T20:18:46+5:30
नागपूर व मुंबईला जोडण्यासाठी ८०० किलोमीटरचा सुपर एक्सप्रेस वे तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - नागपूर व मुंबईला जोडण्यासाठी ८०० किलोमीटरचा सुपर एक्सप्रेस वे तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर - अमरावती - औरंगाबाद - घोटी मार्गे मुंबईत येणारा हा एक्सप्रेस वे २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून यासाठी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शुक्रवारी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराजधानी नागपूर व राजधानी मुंबईला जोडण्यासाठी सुपर एक्सप्रेस वेचा प्रकल्प हाती घेण्याची घोषणा केली आहे. या सुपर एक्सप्रेस वे वेमुळे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र मुंबईशी जोडले जाईल व प्रदाशेक समतोल विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. या सुपर एक्सप्रेव वेवर सीसीटीव्ही, वायफाय अशा अत्याधूनिक सुविधा असतील. तसेच शक्य असेल तिथे रस्त्यालगत आय टी पार्क, स्मार्ट सिडी व शैक्षणिक संकुले उभारण्याचा मनोदयही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हा सुपर एक्सप्रेस वे दोन टप्प्यात बांधण्यात येणार असून या रस्त्यामुळे नागपूर - मुंबई प्रवास अवघ्या १० तासांत शक्य होणार आहे. केंद्र सरकार व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतून रस्त्याचे काम केले जाणार आहे.