रेल्वेचा पुणे विभाग सुपरफास्ट

By admin | Published: April 9, 2016 01:52 AM2016-04-09T01:52:14+5:302016-04-09T01:52:14+5:30

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला २०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये १ हजार १५४ कोटींचे उत्पादन मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३७ कोटींने रेल्वेच्या उत्पान्नात वाढ झाली आहे

Superfast Pune Railway Division | रेल्वेचा पुणे विभाग सुपरफास्ट

रेल्वेचा पुणे विभाग सुपरफास्ट

Next

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला २०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये १ हजार १५४ कोटींचे उत्पादन मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३७ कोटींने रेल्वेच्या उत्पान्नात वाढ झाली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न ६ टक्के अधिक आहे. मागील वर्षी पुणे विभागाला १ हजार १७ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.
गेल्या काही वर्षापासून पुणे विभागाने प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतुकीमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावलेली आहे. या २०१५ -१६ या आर्थिक वर्षामध्ये २.२ मेट्रिक टन माल वाहतुकीद्वारे सुमारे ३२८.८१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जे गेल्यावर्षी २४७.४८ कोटी होते. त्याचप्रमाणे यंदा प्रवासी वाहतुकीद्वारे ७५४.१३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी हे उत्पन्न ७१४.४० कोटीएवढे होते.

Web Title: Superfast Pune Railway Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.