‘शिर्डी विमानतळावरील सुविधांची पाहणी करा’
By admin | Published: April 30, 2017 01:17 AM2017-04-30T01:17:34+5:302017-04-30T01:17:34+5:30
शिर्डी विमानतळावरील पायाभूत सुविधा व सोयींची सर्व विमान कंपन्यानी जाऊन पाहणी करावी असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुंबई : शिर्डी विमानतळावरील पायाभूत सुविधा व सोयींची सर्व विमान कंपन्यानी जाऊन पाहणी करावी असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. २०१८ मध्ये श्री साई समाधी शताब्दी सोहळा साजरा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली विविध विमान कंपन्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी जगभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होणार आहेत. साधारणत: ४२ देशातील जागतिक दर्जाच्या मान्यवरांनी त्यांची उपस्थितीही नोंदवली आहे, असे सांगून मुख्यमंत्रीे म्हणाले की, याकाळात गदीर्चे सगळे उच्चांक मोडण्याची शक्यता आहे. विमान कंपन्यांनी सेवा देतांना आणि वेळापत्रक निश्चित करावे़़शासनाने शिर्डी विमानतळावर २५०० मीटर्सची धावपट्टी विकसित केली आहे ती ३२०० मीटरपर्यंत् वाढवण्याचे नियोजन आहे. (विशेष प्रतिनिधी)