बीडमध्ये पर्यवेक्षकच पुरवतात ‘कॉपी’! ‘स्टींग आॅपरेशन’मधून समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:43 AM2017-11-12T00:43:40+5:302017-11-12T00:44:15+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासून पदवी परीक्षेला सुरूवात झाली. परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याने पहिल्या दिवशी गोंधळ उडाला होता. तर, शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला.
बीड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत शुक्रवारपासून पदवी परीक्षेला सुरूवात झाली. परीक्षा केंद्रांमध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याने पहिल्या दिवशी गोंधळ उडाला होता. तर, शनिवारी कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्राच्या बाहेर भयाण शांतता होती, तर केंद्रात खुलेआम कॉपी करून विद्यार्थी पेपर सोडवित होते. कॉपी पुरविण्यासाठी पर्यवेक्षकच मदत करीत असल्याचेही धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी दुपारी केलेल्या ‘स्टींग आॅपरेशन’मधून समोर आले आहे.
बीडमधील ५ महाविद्यालयांध्ये शनिवारी लोकमत चमुने परीक्षा सुरू असताना भेट दिली. यामध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षकांना मोबाइलसह इतर यंत्र वापरण्यास सक्तमनाई असते. परंतु प्रत्यक्षात पर्यवेक्षक मोबाइलवर सर्रासपणे वर्गातच बोलत होते. तसेच विद्यार्थ्यांकडून इंटरनेटच्या आधारे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू होता.