उपमहापौरपद देणा-या पार्टीला मनसेचा पाठिंबा, ११ नोव्हेंबरला फैसला
By admin | Published: November 4, 2015 06:20 PM2015-11-04T18:20:42+5:302015-11-04T18:20:42+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कोणाची सत्ता स्थापन होणार याचा तिढा रंगलेला असताना काही अटी घालत मनसेने पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ४ - कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये कोणाची सत्ता स्थापन होणार याचा तिढा रंगलेला असताना काही अटी घालत मनसेने पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे. ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून पुढच्या बुधवारी महापौर शिवसेनेचा असेल की भाजपाचा याचं चित्र स्पष्ट होईल. उपमहापौर मिळावं, दोन वर्षे स्थायी समिती सभासदपद मिळावं, महिला बालकल्याण समितीचं अध्यक्षपद मिळावं आणि महत्त्वाच्या आठ समित्यांपैकी तीन समित्यांचं प्रभाग समिती अध्यक्षपद मिळावं यासह एकूण आठ मागण्या मनसेनं केल्या आहेत.
शिवसेनेकडे ५२ जागा आहेत तर भाजपाकडे अपक्ष धरून ४९ जागा आहेत. त्यामुळे ९ नगरसेवक असलेल्या मनसेच्या अटी ज्या पक्षाला मान्य होतील त्या पक्षाचा महापौर होईल असे चित्र आहे.