समर्थकांची जाळपोळ

By admin | Published: June 5, 2016 12:35 AM2016-06-05T00:35:52+5:302016-06-05T00:35:52+5:30

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरसह वरणगाव, बोदवड, सावदा शहर बंद केले़ महामार्गावर ‘रास्ता रोको’

Supporters' arson | समर्थकांची जाळपोळ

समर्थकांची जाळपोळ

Next

जळगाव : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्यानंतर संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरसह वरणगाव, बोदवड, सावदा शहर बंद केले़ महामार्गावर ‘रास्ता रोको’ केल्यानंतर वाहतूक ठप्प झाली, तर वरणगावसह भुसावळ येथे ट्रकसह बसच्या काचा फोडण्यात आल्या. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतर्फे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भुसावळात नाहाटा चौफुलीवर दुपारी ‘रास्ता रोको’ करण्यात आला़ आंदोलनामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या़
मुक्ताईनगरात महामार्ग ठप्प
मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी गावातील बाजारपेठ बंद करत बोदवड चौफुलीवरील महामार्ग रोखून धरला, तसेच ट्रकच्या काचा फोडत मुख्यमंत्र्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दगडफेकीत एका ट्रकच्या काचा फुटल्या़

पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
- खडसेंच्या राजीनाम्यानंतर भुसावळ विभागात राजीनामा सत्र सुरू झाले आहे़
- सावदा येथील भाजपा शहर पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडे सुपुर्द केले.
- भुसावळ शहरातील नगरसेवक, भाजपा शहर पदाधिकारी, कार्यकारी, सर्व आघाड्यांचे सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत. याशिवाय भाजपाच्या जि़प़, पं़स़, सदस्यांसह ग्रामपंचायत सदस्यही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

मुख्यमंत्र्यांचा निषेध
मुक्ताईनगरातील रक्षा पेट्रोल पंपासमोर वाहने आडवी लावून संपूर्ण महामार्ग रोखून धरण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा दिल्या. खडसेंचे स्वीय सहायक योगेश कोलते आल्यानंतर त्यांनी अशा घोषणा देण्यास प्रतिबंध केला.

Web Title: Supporters' arson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.