महिलांना आधार देणा:या बुरूड व्यवसायाला हवा लोकाश्रय!

By admin | Published: August 5, 2014 12:31 AM2014-08-05T00:31:51+5:302014-08-05T00:31:51+5:30

आठवडाभर कोसळणा:या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीसह सर्वच क्षेत्रंना याची आर्थिक झळ पोहोचली आहे.

Supporting women: The lure of the turquoise business! | महिलांना आधार देणा:या बुरूड व्यवसायाला हवा लोकाश्रय!

महिलांना आधार देणा:या बुरूड व्यवसायाला हवा लोकाश्रय!

Next
अनिरुध्द पाटील - बोर्डी
आठवडाभर कोसळणा:या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीसह सर्वच क्षेत्रंना याची आर्थिक झळ पोहोचली आहे. दरम्यान, बुरूडकामातून विविध वस्तू बनवून परिसरातील आठवडा बाजारात विक्री करणा:या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. मार्केटस्टॉल उभारून महिलांच्या आर्थिक सबलीकरणाकरिता शासनपातळीवर प्रय} होणो आवश्यक आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू आदिवासी तालुक्याच्या समुद्रकिना:यालगत बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड, डहाणू, मसोली आदी गावात अनुसूचित जातीतील मायावंशी समाज पिढीजात बुरूड व्यवसाय करतो. बांबूपासून बनवलेली कणगी, करंडे, टोपली, सूप, माशांच्या टोपल्या, पाटय़ा, कोंबडीचे खुराड आदी वस्तू बनविल्या जातात. डहाणू, वाणगांव, बोईसर, पालघर, केळवे, सफाळे, विरार येथील आठवडा बाजारात या वस्तूंची विक्री केली जाते. आधुनिकतेची झळ खेडय़ार्पयत पोहचली असून बदललेल्या जीवनशैलीत प्लास्टीक, सुप, टोपली, टाकी, माशांच्या पाटय़ा याचा वापर वाढला आहे. चिकू, आंबा, लिची ही डहाणूतील प्रमुख फळपिके आहेत. फळ निर्यातीकरीता बांबू, करंडय़ांचा वापर करणारा बागायतदार कागदी खोक्यांचा वापर करीत आहे. या सर्व बाबींचा बुरूड व्यवसायावर परिणाम झाला आहे. बांबुचे भाव दुपटीने वाढल्याने व्यवसाय सांभाळताना कारागिरांना तारेवरची कसरत करावी लागते.
 
महिलांची व्यवसायात मक्तेदारी
4पुर्वीपासून बुरूड व्यवसायात महिलांची मक्तेदारी आहे. दैनंदिन घरकाम, स्वयंपाक सांभाळून दहा ते बारा तास व्यवसायाकरिता दिले जातात. मायावंशी समाजातील सुशिक्षित महिलांनी पारंपरिक कलाकुसरीचा व्यवसाय आनंदाने स्वीकारला आहे. त्यात कल्पकतेने काळानुरूप बदल केले. 
4व्हेजिटेबल ट्रे, एग ट्रे, फ्रुट बॉक्स, लॉन्ड्री बास्केट, विविध खाद्यपदार्थ ठेवण्याच्या वस्तु, फुलदाणी, चिमणी घरटे यांची निर्मिती केली जाते. रंगकामाद्वारे आधुनिक टच दिला जातो. 
4मार्केट फंडा वापरून तारपा महोत्सव व चिकू महोत्सवात स्टॉल उभारले. प्रात्यक्षिकाद्वारे परगावातील पर्यटक, ग्राहकांचे लक्ष वेधले. स्वबळावर बाजार काबीज केला. 
4 स्वयंरोजगारातून घरखर्च सांभाळून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मुलांना देण्याचा पराक्रम काही हिरकणींनी केला.
 
परिसरातील आठवडे बाजार : सोमवार - सफाळे, मंगळवार - घोलवड, बुधवार - केळवे, गुरूवार - बोईसर, शुक्रवार - पालघर, शनिवार -विरार, बोर्डी, रविवार - वाणगांव, उंबरगाव या दिवशी आठवडे बाजार भरत असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादही लाभत आहे. 
 
कार्यशाळांकरिता इमारती : शहरातील मॉल, तालुक्यातील बाजारपेठा, गावपातळीवरील आठवडा बाजारात व्यापारी गाळे, स्टॉल उभारून संबंधितांना देण्याचा प्रय} शासनपातळीवर होणो आवश्यक आहे. कार्यशाळांकरिता इमारती, कमी व्याजदराची दिर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा होणो आवश्यक आहे. 

 

Web Title: Supporting women: The lure of the turquoise business!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.