डान्स बार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

By admin | Published: April 18, 2016 12:50 PM2016-04-18T12:50:37+5:302016-04-18T12:50:37+5:30

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला याप्रकरणी 25 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत

Supreme Court blames state government for dance bars | डान्स बार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

डान्स बार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १८ - डान्स बार परवान्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. राज्य सरकारने आदेशाचं पालन न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेशाची अंमलबजाणी का केली जात नाही ? असा सवाल राज्य सरकारला विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला याप्रकरणी 25 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 2 मार्चला न्यायालयाने 14 दिवसांत डान्स बार परवाने देण्याचे आदेश दिले होते. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच पालन न करण्याची ही सहावी वेळ असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. 15 मार्चला डान्स बारचे 2 परवाने देण्यात आले होते पण 18 मार्चला ते परत घेण्यात आले. ज्या पोलिसांनी हे परवाने जारी केले होते त्यांच्यावर कारवाईदेखील करण्यात आली होती. 
 

Web Title: Supreme Court blames state government for dance bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.