‘साई’वादात पडण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
By admin | Published: October 14, 2014 02:16 AM2014-10-14T02:16:45+5:302014-10-14T02:16:45+5:30
साईबाबा-शंकराचार्य वादात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला़
Next
शंकराचार्याचा मुद्दा : श्रद्धेशी संबंधित प्रकरण असल्याने हस्तक्षेप करणार नाही
नवी दिल्ली : साईबाबा-शंकराचार्य वादात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला़ हे श्रद्धेशी संबंधित प्रकरण आह़े त्यामुळे आम्ही यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केल़े
द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांना साईबाबांच्या पूजाअर्चेविरुद्ध बयानबाजी करण्यापासून रोखाव़े तसेच छत्तीसगडच्या कवर्धा येथे आयोजित धर्मसंसदेतील निर्णयानुसार मंदिरातून बाहेर काढण्यात आलेल्या साईबाबांच्या मूर्तीची पुन्हा स्थापना करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका साईधाम चॅरिटेबल ट्रस्टने दाखल केली होती़ सर्वोच्च न्यायालयाचे न्या़ तीरथ सिंह ठाकूर यांच्या खंडपीठाने असे स्पष्ट केले, की हा श्रद्धेचा वाद असल्याने न्यायालय यात कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही़ साईबाबांच्या मूर्ती मंदिरातून हटविल्या जात असतील तर साईभक्त याविरुद्ध दिवाणी न्यायालय वा पोलिसांत तक्रार नोंदवू शकतात, असेही न्यायालयाने नमूद केले.
यापूर्वी स्वामी स्वरूपानंद यांना साईबाबांविरुद्ध वादग्रस्त विधान करण्यापासून रोखावे, अशा आशयाच्या एका याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात दोनदा स्थगित करावी लागली होती़ 27 सप्टेंबरला न्या़ एस़ ए़ बोबडे यांनी या सुनावणीस नकार दिला होता. तथापि यामागचे कुठलेही कारण त्यांनी स्पष्ट केले नव्हत़े याच्या 1क् दिवस आधी म्हणजे 17 सप्टेंबरला न्या़ अनिल आऱ दवे यांनी आपण साईबाबांसंबंधित एका ट्रस्टचे सदस्य असल्याचे सांगत या प्रकरणाच्या सुनावणीस नकार दिला होता.
काय होता वाद ?
दोन महिन्यांपूर्वी हरिद्वारमध्ये स्वामी स्वरूपानंद यांनी शिर्डीचे साईबाबा हे काही देव नव्हेत, असे सांगून या वादाला तोंड फोडले होत़े त्यांच्या या वक्तव्यावर देशासह शिर्डीतही संतप्त प्रतिक्रिया उमटली होती़