'त्या' तीन डान्सबारना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
By admin | Published: September 21, 2016 01:09 PM2016-09-21T13:09:43+5:302016-09-21T13:22:47+5:30
सीसीटीव्ही व्यवस्थित कार्यरत असलेले तीन डान्सबार सुरु ठेवायला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - सीसीटीव्ही व्यवस्थित कार्यरत असलेले तीन डान्सबार सुरु ठेवायला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे.
गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जोरदार दणका देत डान्सबार बंदीच्या निर्णयाला स्थगिती देत राज्यात डान्स बार चालवण्याची परवानगी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरही डान्सबार सुरु करण्यासाठी राज्य सरकारने जाचक अटी घातल्या आहेत. या विरोधात बार मालक पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले होते.
डान्सबारना तुम्ही सरसकट बंदी करू शकत नाही. मात्र, तेथे काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अटी मात्र जरूर घालू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविताना स्पष्ट केले होते. त्यामुळे डान्सबारच्या परवान्यासाठी २६ अटी घातल्या आहेत.
डान्सबार सुरु झाल्यानंतर तिथे अश्लीलता असू नये असे सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवतानाच स्पष्ट केले होते. त्यामुळे नव्या अटींनुसार डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक आहे आणि सीसीटीव्हीचे थेट कनेक्शन नजीकच्या पोलिस स्थानकाला जोडलेले असले पाहिजे.