नितीन गडकरींनी केला गौप्यस्फोट; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ते पंतप्रधान झाले तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 04:40 PM2024-09-15T16:40:12+5:302024-09-15T16:44:19+5:30

Supriya Sule on Nitin Gadkari : विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी केला. त्यांच्या या विधानावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले.

Supriya Sule backs Nitin Gadkari, says "If he becomes PM..." | नितीन गडकरींनी केला गौप्यस्फोट; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ते पंतप्रधान झाले तर..."

नितीन गडकरींनी केला गौप्यस्फोट; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ते पंतप्रधान झाले तर..."

Supriya Sule Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान पदाबद्दलच्या ऑफरचा गौप्यस्फोट केला. विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असे गडकरी म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केले. 

माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी यासंदर्भात ऐकले नाही. नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्या नेत्याची देशाला गरज आहे. ते जर पंतप्रधान झाले, तर आम्हाला आनंदच होईल. एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसेल."

गडकरी गलिच्छ राजकारण करत नाही -सुप्रिया सुळे


नितीन गडकरींच्या राजकारणाचे कौतुक करत सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे भाजप नेतृत्वाला लक्ष्य केले. "नितीन गडकरी यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे. ते गलिच्छ राजकारण करत नाहीत. सत्तेसाठी त्यांनी कधी आपली भूमिका बदलली नाही, ही त्यांची खासियत आहे. त्यांचे मन खूप मोठे आहे. विकासात ते कधीच राजकारण करत नाहीत", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

केजरीवालांनी दिला राजीनामा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे खूप दुर्दैवी

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे, कारण यामध्ये एजन्सीचा गैरवापर झाला आहे. आयकर विभाग, सीबीआय आणि ईडी याचा गैरवापर होतो, हे सातत्याने आम्ही बोलतो. एकतर याची भीती दाखवायची नाहीतर वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे."

"हा देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालणार आहे. म्हणून जे आधी मोदी सरकार होते, ते आता एनडीए सरकार झाले आहे. अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल चुकीची लाईन सरकारने घेतली आहे. केजरीवाल हे देशाचे मोठे नेते आहेत. हा विषय संविधानासाठी खूप महत्त्वाचा होता. चुकीच्या पद्धतीने त्यांना अटक झाली", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Web Title: Supriya Sule backs Nitin Gadkari, says "If he becomes PM..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.