“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 02:16 PM2024-10-01T14:16:46+5:302024-10-01T14:17:43+5:30
NCP SP MP Supriya Sule News: आपल्यावर संस्कार झालेले आहेत, बैलपोळा साजरा करतो, आम्ही शेतकरी आहोत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यासंदर्भातील निर्णयावर दिली.
NCP SP MP Supriya Sule News: आपण नेहमी गोमाताच म्हणतो गाईला माता म्हणणारी आपली संस्कृती आहे अन्नपूर्णेची ही आपण पूजा करतो अन्नाची पूजा होते त्यामुळे मला नवीन वाटत नाही जे आपल्यावर संस्कार झालेले आहेत बैलपोळा करतोच, आम्ही सगळे शेतकरी आहोत, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले.
भावी मुख्यमंत्री या यादीत आता रोहित पवार यांचेही नाव जोडले गेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास रोहित पवार यांना मंत्रीपद देण्याचा शब्द आजोबा शरद पवार यांनी एका सभेत बोलताना दिला. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार यांचे बॅनर झळकले. पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी स्पष्ट शब्दांत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
रोहित पवार मुख्यमंत्री झाले, शरद पवारांचा वारसा चालवला तर हरकत काय?
माझ्या वडिलांचा वारसा कुणीही चालवू शकते. रोहित पवार जर मुख्यमंत्री झाले किंवा शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर माझी हरकत असण्याचे कारणच काय? असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. अमित शाह पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, मुंबई, नवी मुंबईत बैठका घेणार आहेत. यावर बोलताना, अतिथी देवो भव. पाहुण्यांचे स्वागत झाले पाहिजे, आम्ही अदृश्य शक्ती वाले नाही. आम्ही संविधानवाले आहोत, संविधान केंद्र ठेवून आम्ही राजकारण करतो, सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे. शरद पवार यांना रोखा, उद्धवजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या, अशी त्यांची विचारसरणी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार. एक वर्षांपूर्वी आम्ही कुठे होतो आणि आज कुठे आहोत, एक वर्षांपूर्वींना पक्ष कुठे होता, चिन्ह कुठे होते, आमदार-खासदार जे जी सत्तेची पद होती, त्यातील पक्ष चिन्ह घेऊन आमचे आयुष्य उद्ध्वस्त करून ते घेऊन गेले. मुलीचा वाढदिवस कोर्टात केला. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं., मायबाप महाराष्ट्राच्या जनतेने साथ दिली. कारण मायबाप जनतेच्या लक्षात आले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला आहे. अदृश्य शक्तीला असे वाटते की, अदृश्य शक्ती दिल्लीवरून काहीही करू शकते. या राज्याने दाखवून दिले की, अदृश्य शक्ती ते चालू शकत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.