शेतक-यांवर दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर उतरणार - सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:49 AM2017-10-14T03:49:51+5:302017-10-14T03:50:14+5:30
महागाईबद्दल बोलणा-या सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडाची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापा-यांवर अचानक धाडी टाकून
नाशिक : महागाईबद्दल बोलणा-या सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडाची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापा-यांवर अचानक धाडी टाकून शेतक-यांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे ‘जागर युवा संवादाचा’ कार्यक्र मात दिला.
सरकार योग्य निर्णय घेते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. निवडणूक निकालांच्या वातावरणातून बाहेर पडून सरकारने आता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, शेतकरी-व्यापाºयांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढावा. शेतकºयांना मनापासून कर्जमाफी देण्याचा भाजपा सरकारचा हेतू नसल्यानेच आॅनलाइन अर्जाची अट घातली आहे. अर्ज चुकला तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे हे काय धोरण आहे, असेही त्यांनी सांगितले.