शिंदे-फडणवीस सरकारला एक दुजे के लिए म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना संजय शिरसाटांचा खोचक टोला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 11:11 PM2022-08-02T23:11:07+5:302022-08-02T23:12:13+5:30

Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार हे हम बने तुम बने एक दुजे के लिए, असं आहे अशी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Supriya Sulena, who called the Shinde-Fadnavis government as a second party, said Sanjay Shirsat's group... | शिंदे-फडणवीस सरकारला एक दुजे के लिए म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना संजय शिरसाटांचा खोचक टोला, म्हणाले...

शिंदे-फडणवीस सरकारला एक दुजे के लिए म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना संजय शिरसाटांचा खोचक टोला, म्हणाले...

Next

मुंबई - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र महिना उलटून गेला तरी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार हे हम बने तुम बने एक दुजे के लिए, असं आहे अशी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मविआ सरकारमध्ये अकेले हम, अकेले तुम अशी परिस्थिती होती. उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे एकेकट्याने कारभार पाहत होते, आमचं सरकार एकमतानं काम करतंय, तुम्ही काळजी करू नका असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने शिंदे फडणवीस सरकारवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून टीका होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही शिंदे सरकारवर निशाणा साधला होता. भाजपाच्याच खासदारानेच सांगितलं की, हे एक दुजे के लिए सरकार आहे. दोनच लोकांचं सरकार आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. पण निर्णय घेण्यासाठी प्रशासनासमोर पर्याय नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला होता.

त्याला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, या सरकारबाबत म्हणाल तर हे सरकार किमान एक दुजे के लिए तरी आहे. तुमचं सरकार तर अकेले हम अकेले तुम... असं होतं. उद्धव ठाकरे एकीकडे आणि अजित पवार दुसरीकडे अशी परिस्थिती होती, असे शिरसाट म्हणाले. 

Web Title: Supriya Sulena, who called the Shinde-Fadnavis government as a second party, said Sanjay Shirsat's group...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.