मुख्यमंत्री नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतात, सुप्रिया सुळेंची खोचक टीका
By admin | Published: September 29, 2016 11:59 AM2016-09-29T11:59:48+5:302016-09-29T11:59:48+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तापट स्वाभावाचे आहेत. नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा भांडतात अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तापट स्वाभावाचे आहेत. नळावरच्या बायकांप्रमाणे वसावसा भांडतात अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांना गुस्सा क्यूं आता है असं नव्हे तर इनको गुस्साही आता है अशी खिल्लीही सुप्रिया सुळेंनी उडवली. मावळ येथील महिला मेळव्यात बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्यांचा पारा नेहमीच चढलेला असतो आणि वसावसा, वसावसा नळावरच्या बायकांप्रमाणे भांडतात', असं सुप्रिया सोळे बोलल्या आहेत. 'आजपर्यंत मी इतके मुख्यमंत्री पाहिलेत, पण इतका चिडका बिब्बा पाहिला नाही. मुख्यमंत्री आमच्यापेक्षा फार काही लहान नाहीत. पण मुख्यमंत्रीपद हे खूप मोठं आणि त्यात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे खूपच मोठं आहे. त्यामुळे त्यांनी या पदाचा मान राखावा', असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
'मुख्यंत्र्यांना भेटायला जाताना हेल्मेट घालून जावं, काय माहित कधी चिडलेले असताना काही फेकून मारतील', असा टोमणाही सुप्रिया सुळेंनी मारला.