"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 11:03 AM2024-09-09T11:03:35+5:302024-09-09T11:06:14+5:30

Supriya Sule Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानावर बोट ठेवत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली. 

Supriya Sule's post after Devendra Fadnavis' 'that' statement, "...he has publicly admitted it" | "...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

"...याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय", फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

Supriya Sule Mahayuti : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली, तरी राज्यात राजकीय प्रचार हळूहळू जोर धरू लागला आहे. आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारबद्दल केलेल्या एका विधानावरून सुप्रिया सुळेंनीमहायुतीवर निशाणा साधला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा व्हिडीओ पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

सुप्रिया सुळेंची पोस्ट काय?
 
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की, त्यांच्या सरकारचा वेग गोगलगायीचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढे जाण्यासाठी धक्का मारावा लागतो असंही त्यांनी कबूल केलेय."

ज्योतिबा फुलेंचा विचार, महायुतीला टोला

सुप्रिया सुळे पुढे म्हणतात, "थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतीमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय? थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले द्रष्टेपणाने म्हणालेच होते -'विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।" 

हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे -सुप्रिया सुळे

"खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले. या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले म्हणजेच वित्त गेले. वित्त नाही म्हणून शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊ शकत नाही. तात्पर्य काय तर महायुतीचे हे सरकार सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली आहे. 

देवेंद्र फडणवीस काय बोलले?

"आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते, तिला गोगलगायीची पावले असतात. ती गोगलगायीच्याच पावलाने पुढे जाते, तिला धक्काच मारावा लागतो. धक्का मारल्याशिवाय काहीच पुढे जात नाहीत. अर्थसंकल्पात आपण विद्यापीठाची घोषणा केली. शासन निर्णय काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की, पहिले मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झाले आहे", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  

Web Title: Supriya Sule's post after Devendra Fadnavis' 'that' statement, "...he has publicly admitted it"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.