सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार : अंकितच्या सुरांनी आज स्वरांकित होणार संध्याकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:07 AM2018-03-23T02:07:05+5:302018-03-23T02:07:05+5:30
लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ च्या वितरण समारंभाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज २३ मार्च रोजी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचा रंगारंग प्रारंभ होणार आहे.
नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ च्या वितरण समारंभाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज २३ मार्च रोजी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचा रंगारंग प्रारंभ होणार आहे. सुन रहा हैं ना तू..., गलीया तेरी गलीया...यासारखे थेट हृदयात उतरणारे गीत गाणाºया अंकित तिवारीच्या सुरांनी आजची संध्याकाळ स्वरांकित होणार आहे. यासोबतच गाईड, चौदहवी का चाँद, नीलकमल, पथ्थर के सनम, साहब बीबी और गुलाम यारख्या अजरामर चित्रपटांना आपल्या अभिनयाचा साज चढविणाºया पद्मभूषण वहिदा रहमान त्यांच्या रुपेरी आयुष्याच्या आठवणी या कार्यक्रमात शेअर करणार आहेत.ं
या देखण्या संगीत सोहळ्याला आपल्या नजरेत साठवण्यासाठी नागपूरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून या कार्यक्रमाच्या मोजक्याच उरलेल्या पासेस मिळवण्यासाठी त्यांच्यात जणू स्पर्धा लागली आहे. ह्यसंगीत सम्राटह्ण व ह्यसा रे ग म लिटील चॅम्प्सह्णचा पुरस्कार जिंकणारी गोड गळ्याची बालगायिका अंजली गायकवाड व मथुरेच्या शास्त्रीय गायनाची परंपरा पुढे चालवणारे ब्रजवासी ब्रदर्स या संगीताच्या भिन्न सुरांना एकाच मंचावर ऐकण्याची संधी या संगीत सोहळ्याच्या निमित्ताने लाभली आहे. आतापर्यंत केवळ टीव्हीवर पाहिलेल्या या प्रतिभावंतांना आज प्रत्यक्ष पाहता येणार असल्याने नागपूरकर रसिक डोळ्यात प्राण आणून संध्याकाळची प्रतीक्षा करीत आहेत. या कार्यक्रमाच्या मोजक्या पासेस शिल्लक असून दुपारी १ पर्यंत लोकमत कार्यालयातून ‘आधी या आधी मिळवा’ या तत्त्वावर रसिकांना त्या मिळवता येणार आहेत. परिवार चाय प्रस्तुत आणि हिलफोर्ट पब्लिक स्कूल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला असून, ९२.७ बिग एफएम हे रेडिओ पार्टनर तसेच ब्राईट आऊटडोअर हे या कार्यक्रमाचे आऊटडोअर पार्टनर व ग्रीन ट्युन्स हे ग्रीन पार्टनर आहेत.
फडणवीस, गडकरींसह
मान्यवरांची मांदियाळी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थमंत्री सुुधीर मुनगंटीवार, ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते प्रफुल्ल पटेल, खा. कृपाल तुमाने, खा. रामदास तडस व महापौर नंदा जिचकार या सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.