सूरज परमार आत्महत्या प्रकरण, नगरसेवकांचं पद रद्द करण्याचे आदेश
By admin | Published: March 14, 2016 08:05 AM2016-03-14T08:05:09+5:302016-03-14T08:09:02+5:30
ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी गोत्यात आलेले ठाणे महापालिकेतील चारही नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १४ - ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी गोत्यात आलेले ठाणे महापालिकेतील चारही नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या चारही नगरसेवकांच नगरसेवक पद रद्द होणार आहे.
ठाण्यातील बिल्डर आणि कॉसमॉस समुहाचे प्रमूख सूरज परमार यांनी आत्महत्या केली होती. परमार यांच्या सूसाइड नोटमध्ये ठाण्यातील या चौघा नगरसेवकांचे नाव होते. राजकीय नेत्यांना पैसे दिले, तरी कामे होत नव्हती, असा उल्लेखही त्यांच्या नोटमध्ये करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या चौघा नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे राज्य सरकारने ठाणे महापालिकेला आदेश दिले आहेत. या प्रकरणात चारही नगरसेवकांना अटकही झाली होती