अहमदनगरच्या महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा कदम
By admin | Published: June 21, 2016 12:29 PM2016-06-21T12:29:20+5:302016-06-21T12:29:20+5:30
अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा संभाजी कदम यांची बिनविरोध तर उपमहापौरपदी भाजपचे श्रीपाद छिंदम यांची अनपेक्षितरित्या निवड झाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
भाजपचे श्रीपाद छिंदम उपमहापौर
अहमदनगर, दि. 21 - अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या सुरेखा संभाजी कदम यांची बिनविरोध, तर उपमहापौरपदी भाजपचे श्रीपाद छिंदम यांची अनपेक्षितरित्या निवड झाली आहे.
महापौरपदाच्या निवडीत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नंदा साठे यांनी माघार घेतल्याने कदम यांचा मार्ग मोकळा झाला. तर भाजपमधीलच अॅड. अभय आगरकर यांच्या गटाचे उपमहापौरपदाचे उमेदवार दत्ता कावरे यांनी माघार घेतल्याने खासदार दिलीप गांधी गटाच्या छिंदम यांची उपमहापौरपर्दी वर्णी लागली. कावरे यांना नंतरचे सव्वा वर्ष उपमहापौरपद देण्यात येणार असल्याचे समजते. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी या राजकीय हालचालीत प्रमुख भूमिका बजावली. निवडीनंतर शिवसैनिकांनी हातात भगवे ध्वज घेत महापालिकेसमोर जल्लोष केला.