सुरेश खाडेंचे मंत्रिपदासाठी सरसंघचालकांना साकडे

By admin | Published: August 2, 2015 11:15 PM2015-08-02T23:15:33+5:302015-08-03T00:08:40+5:30

सुरेश खाडेंचे मंत्रिपदासाठी सरसंघचालकांना साकडे

Suresh Khadane's ministerial secretary | सुरेश खाडेंचे मंत्रिपदासाठी सरसंघचालकांना साकडे

सुरेश खाडेंचे मंत्रिपदासाठी सरसंघचालकांना साकडे

Next

सदानंद औंधे - मिरज -युतीचे शासन सत्तेवर येऊन वर्ष पूर्ण होत आल्यानंतरही मंत्रिपदावर वर्णी न लागल्याने आ. सुरेश खाडे यांच्या गोटात अस्वस्थता आहे. भाजप नेत्यांच्या दुर्लक्षामुळे आ. खाडे यांनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना मंत्रिपदासाठी साकडे घातले आहे. भाजपतर्फे जिल्ह्यात राखीव मतदारसंघातून तीनवेळा विधानसभेत निवडून येणाऱ्या आ. सुरेश खाडे यांचा मंत्रिपदावर दावा आहे. सलग तिसऱ्यांदा विजय मिळविल्यानंतर आ. खाडे पालकमंत्री असल्याच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या होत्या. समाजकल्याण विभाग नको, तर सार्वजनिक बांधकाम विभाग हवा असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी आ. खाडे यांचे मंत्रिपदाच्या शर्यतीत नाव होते; मात्र कोठे तरी माशी शिंकली आणि आ. खाडे यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. खाडे हे मुंडे गटाचे असतानाही आ. खाडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. याबाबत खाडे समर्थकांत नाराजी आहे. जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सख्य आहे. मात्र मिरजेतील काही प्रमुख पदाधिकारी आ. खाडे यांना विरोध करीत असल्याचे समर्थकांची तक्रार आहे. या कारणावरून काही दिवसांपूर्वी वादावादी, बाचाबाचीचे प्रकार घडले होते. खा. संजय पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशीही आ. खाडे गटाचे फारसे सख्य नाही. मिरजेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रश्नावरून खासदार, आमदारांत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. खाडे यांना मंत्रीपद मिळवून देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेसुध्दा सूचक मौन बाळगून आहेत. अन्न व औषधमंत्री गिरीश बापट, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी आ. खाडे यांची जवळीक आहे. सांगली जिल्ह्यात पाच आमदार निवडून येऊनसुध्दा भाजपचा एकही मंत्री नसल्याने आ. खाडे यांना मंत्रीपद देण्यात आले नसल्याने आ. खाडे समर्थक निराश आहेत. कार्यकर्त्यांचा मंत्रिपदाचा आग्रह असल्याने आ. खाडे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी संपर्क साधला आहे. पुणे येथे शंकर अभ्यंकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक भागवत यांच्याहस्ते झाले. यावेळी सरसंघचालकांची भेट घेऊन आ. खाडे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्याबाबत चर्चा केली. सरसंघचालकांमार्फत आ. खाडे मंत्रीपद मिळविण्यात यशस्वी होणार का? याबाबत मिरजेत भाजप कार्यकर्त्यांत चर्चा रंगली आहे.

दबावासाठी प्रयत्न!
चर्चेचा अधिक तपशील समजू शकला नाही, मात्र यानिमित्ताने मंत्रिपदासाठी संघाकडून भाजप नेतृत्वावर दबाव आणण्यासाठी आ. खाडे यांचा प्रयत्न असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Suresh Khadane's ministerial secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.