लातूरच्या महापौरपदी भाजपाचे सुरेश पवार

By Admin | Published: May 22, 2017 01:54 PM2017-05-22T13:54:05+5:302017-05-22T13:55:21+5:30

भाजपाने महापौरपदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून पक्षात आलेल्या सुरेश पवार यांना बसवून काँग्रेसह भाजपाच्या निष्ठावंतानाही धक्का दिला.

Suresh Pawar, BJP's Mayor of Latur | लातूरच्या महापौरपदी भाजपाचे सुरेश पवार

लातूरच्या महापौरपदी भाजपाचे सुरेश पवार

googlenewsNext
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
लातूर, दि. 22 -  लातूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकविलेल्या भाजपाने महापौरपदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून पक्षात आलेल्या सुरेश पवार यांना बसवून काँग्रेसह भाजपाच्या निष्ठावंतानाही धक्का दिला. तर उपमहापौरपदी देविदास काळे या भाजपा निष्ठावंतांला संधी दिली. या निवडणुकीत भाजपाच्या दोन्ही उमेदवारांना ३६ तर काँग्रेस उमेदवारांना स्वत:ची ३३ व राष्टÑवादीचे एक असे  प्रत्येकी ३४ मते मिळाली. काँग्रेसचे महापौरपदाचे विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौरपदाचे उमेदवार युनूस मोमीन यांना दोन-दोन मताने पराभूत व्हावे लागले. अनुभवी सुरेश पवार यांच्या निवडीमुळे महापालिकेचा गाडा चालवायला अनुभवी चेहरा मिळाला आहे. 
 
सभागृहात एकमेव सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिल्याने  बलाबल ३४ मते मिळाली. लातूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची एकहाती सत्ता होती़ पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ७० पैकी सर्वाधिक ३६ जागांवर भाजपाने विजय मिळविला. तर सत्तेत असेलल्या काँग्रेसला ३३ व राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी झाली. 
 
बहुमतात आलेल्या भाजपाचा महापौर होणार हे निकालाच्या दिवशीच निश्चित झाले होते़ मात्र कोणाची वर्णी लागणार याबाबात भाजपात अखेरपर्यंत गुप्तता पाळण्यात आली़ उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाकडून महापौर व उपमहापौरपदासाठी प्रत्येकी चार अर्ज दाखल करण्यात आले होती. सोमवारी निवड प्रक्रिया सुरू होण्याअगोदर भाजपाचे सर्व नगरसेवक एकाच वेळी
सभागृहात आले़ सकाळी १० वाजता महापौरपदाची निवड प्रक्रिया सुरू झाली. 
 
उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी ५ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता़ यावेळी भाजपाकडून अ‍ॅड़ शैलेश गोजमगुंडे, शोभा पाटील, देविदास काळे यांनी माघार घेतली़ त्यामुळे भाजपाचे सुरेश पवार विरूध्द काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांच्यात निवडणूक झाली़ यावेळी सुरेश पवार यांना ३६ तर विक्रांत गोजमगुंडे यांना ३४ मते मिळाली़ त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी भाजपाचे सुरेश पवार यांनी विजयी घोषित केले़ त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपाकडून तिघांनी माघार घेतले़ एकमेव देविदास काळे यांचा अर्ज भाजपाकडून राहिल्याने काँग्रेसचे युनूस मोमीन यांच्यात लढत झाली़ त्यात काळे यांना ३६ व मोमीन यांना ३४ मते मिळाली़ भाजपाचे पहिल्यांदाच मनपात सत्ता स्थापन केल्याने कार्यकर्त्यांनी मनपाच्या आवारात फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष केला़
 
काँग्रेसला धक्का; पण भाजपा निष्ठावंतातून मात्र तीव्र नाराजी 
महापौरपदी काँग्रेसचा चेहरा देऊन भाजपाने काँग्रेसलाही जोरदार धक्का दिला आहे. कारण सुरेश पवार यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेस नेत्यांनी हे चेहरे मनपात दिसणार नाहीत, असा ईशारा दिला होता. यानंतरही पवार निवडून आलेच शिवाय भाजपाने संधी दिल्याने आता महापौरही झाले. दुसरीकडे भाजपाच्या या निर्णयाचा पक्षातील निष्ठावंतांनाही मोठा धक्का आहे. उपमहापौर देविदास काळे, नगरसेवक शैलेश गोजमगुंडे यांच्यासह मूळ पक्षात ३० - ४० वर्षे राबलेले कार्यकर्ते  आम्ही काय सतरंज्यांच उचलायच्या का? असा सवाल करीत आहेत. मोठ्या मुश्कीलीने आलेली सत्ता भाजपाची होती की काँग्रेसमधून आलेल्यांसाठी असा प्रश्न निष्ठावंतांमधून विचारला जात आहे.
 
पहिल्याच सभेत गोंधळ ! 
मनपात भाजपाने सत्ता स्थापन केली असून पहिल्याच सभेत सभागृह नेता निवडीवरून काँग्रेस-भाजपाच्या सदस्यांत खडाजंगी झाली़ महापौर सुरेश पवार यांच्या समोर काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला़ पुढील सभेत भाजपाचा सभागृह नेता निवडला जाईल, असे महापौर पवार यांनी सांगितले़

Web Title: Suresh Pawar, BJP's Mayor of Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.