कोकणशी नाळ तुटू देणार नाही : सुरेश प्रभू

By Admin | Published: January 5, 2015 06:55 PM2015-01-05T18:55:29+5:302015-01-05T18:59:39+5:30

रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावकर नाट्यगृहात आयोजित नागरी सत्काराच्यावेळी ते बोलत होते

Suresh Prabhu will not give a blow to Konkan | कोकणशी नाळ तुटू देणार नाही : सुरेश प्रभू

कोकणशी नाळ तुटू देणार नाही : सुरेश प्रभू

googlenewsNext

रत्नागिरी : चार्टर्ड अकौंटंट असलेला मी राजकारणात येईन, असे कधीच वाटले नव्हते. मात्र, मी लहान माणूस असूनही मोठ्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हणूनच मला राजकारणातील मोठी पदे मिळाली. हा नागरी सत्कार म्हणजे कोकणवासियांची माझ्या पाठीवर प्रेमाची थाप आहे. त्यामुळेहे, ती तुटू देणार नाही. सत्कारापेक्षा सत्कार्य महत्त्वाचे असून ते मला करायचे आहे, असे भावोद्गार रेल्वेमंत्री सुरेश मी देशाचा मंत्री असलो तरी नाळ कोकणला जोडलेली आप्रभू यांनी काढले.
रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावकर नाट्यगृहात आयोजित नागरी सत्काराच्यावेळी ते बोलत होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखालील नागरी सत्कार समितीतर्फे हा सर्वपक्षीय सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर होते.
प्रभू म्हणाले, आपल्या आजवरच्या राजकीय वाटचालीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खूप प्रेम दिले, संधी दिली. आता पंतप्रधान मोदी यांनी रेल्वेमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. सर्वांच्या सदिच्छेने ही जबाबदारी यशस्वी करायची आहे. कोकण रेल्वेचे स्वप्न साकारण्यात प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, रामकृष्ण हेगडे यांचे योगदान मोठे होते.
खासदार विनायक राऊत म्हणाले, कोणत्याही सदनाचे सदस्यत्व नसताना थेट रेल्वेमंत्री या महत्त्वाच्या पदावर सुरेश प्रभू यांची झालेली निवड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणचा केलेला गौरव आहे. त्यामुळे कोकणात बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते या नेत्यांच्या पंक्तीत प्रभू यांनीही स्थान मिळविले आहे. आम्ही त्यांच्याकडे कोकण रेल्वेच्याच नव्हे; तर अन्य खात्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी हट्टाने, हक्काने करणारच आहोत. कोकणात पावसाचे प्रमाण अधिक आहे. रत्नागिरी व काही मोजकी महत्त्वाची रेल्वे स्थानके वगळता अन्य सर्व स्थानकांवर अपुऱ्या निवारा शेड्स आहेत. संपूर्ण प्लॅटफॉर्मलाच निवारा शेडस उभारल्या जाव्यात. कोकण रेल्वेसाठी स्वतंत्र मालवाहतूक मार्ग तयार करावा, अशा मागण्या खासदार राऊत यांनी केल्या.
सत्कार समिती अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)

Web Title: Suresh Prabhu will not give a blow to Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.