सुरेश वाडकरांचा अटकपूर्व जामीन ८ जुलैपर्यंत कायम
By admin | Published: July 2, 2014 04:23 AM2014-07-02T04:23:18+5:302014-07-02T04:23:18+5:30
भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फ सविल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचा अटकपूर्व जामीन ८ जुलैपर्यंत कायम
नाशिक : भागीदारीत घेतलेल्या जमिनीचा भागीदाराला डावलून परस्पर व्यवहार करून फ सविल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचा अटकपूर्व जामीन ८ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी ८ जुलैपर्यंत जामीन कायम ठेवला आहे़ या प्रकरणात जबाब घेण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्याची मागणी
भद्रकाली पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती़
देवळाली शिवारातील जमीन खरेदीचे हे प्रकरण आहे़ जमिनीचे मूळ मालक विनायक धोपावकर व विजया करंदीकर यांना हाताशी धरून ७ फेब्रुवारी २०१३ रोजी वादात सापडलेली मिळकत वाडकर यांनी स्वत:च्या नावे लिहून घेतली, अशी तक्रार याचिका हेमंत कोठीकर यांनी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात फ सवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता़ वाडकर यांनी वकिलांमार्फ त २८ जूनला जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. (प्रतिनिधी)