‘सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार ठरू शकतो बुमरॅँग’
By Admin | Published: October 15, 2016 03:34 AM2016-10-15T03:34:35+5:302016-10-15T03:34:35+5:30
‘सर्जिकल स्ट्राईक’चा प्रचार हा बूमरँंग असतो, याचे अनेकदा वाईट अनुभव आले आहेत. मोदी सरकारने स्ट्राईकचा एवढा मोठा गवगवा केला, की त्याच्या उलट-सुलट प्रतिक्रिया
पुणे : ‘सर्जिकल स्ट्राईक’चा प्रचार हा बूमरँंग असतो, याचे अनेकदा वाईट अनुभव आले आहेत. मोदी सरकारने स्ट्राईकचा एवढा मोठा गवगवा केला, की त्याच्या उलट-सुलट प्रतिक्रिया समोर आल्या. जनतेला काय सांगावे काय सांगू नये, याचे भान सरकारला नाही, अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
पाकिस्तानमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून लष्करी सैन्याने केलेल्या कामगिरीवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काँग्रेसने त्यांच्या काळात केवळ लष्करी कारवाया केल्या असल्याचा दावा केला आहे. त्या विषयी विचारले असता, शिंदे यांनी
काँग्रेसच्या काळात तीन सर्जिकल स्ट्राईक केल्याचा पुनरूच्चार करुन ते म्हणाले, ‘‘ मी केंद्रीय गृहमंत्री असतानाच एक सर्जिकल स्ट्राईक झाला आहे. पण त्याची आम्ही कधी प्रसिद्धी केली नाही. कारण ते एक बूमरँग असते. अनेकदा याचे वाईट अनुभव आले आहेत. याकुबला फाशी दिल्यानंतर त्याचे पार्थिव मुंबईला आणले. त्याच्या अंत्यसंस्कारावेळी ७० हजार लोक उपस्थित होते, हे चांगले लक्षण नाही. या गोष्टीमुळे दोन समाजामध्ये विनाकारण द्वेष निर्माण होतो. हेच सर्जिकल स्ट्राईकने केले. त्याचा मोठा प्रचार झाल्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायल्या मिळाल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा प्रचार केला जात आहे. (प्रतिनिधी)